संगमनेर (दैनिक युवावार्ता) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील घुलेवाडी येथील साठे नगर येथे रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, निरक्षर असूनही त्यांनी अनेक कथा, कविता, पोवाडे, प्रवासवर्णन, कवन, कांदबरीचे लेखन केले. सातासमुद्रापार त्यांनी आपली कला सादर केली. छत्रपती , फुले , शाहु, आंबेडकर यांची विचारधारा जपण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्मोत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून घुलेवाडी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, रणजित देशमुख,दैनिक युवावार्ताचे संपादक किसन भाऊ हासे, ग्रा. सरपंच निर्मलाताई राऊत , दत्तात्रय राऊत, प्रदिप सरोदे, अविनाश उर्फ खंडू सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र बबन आव्हाड उपाध्यक्ष सागर कांबळे मार्गदर्शक शिवाजी आव्हाड खजिनदार विकी पवार संतोष आव्हाड संयोजक निलेश लांडगे सचिव निलेश पवार आदी समितीच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.