नगरपरीषद निवडणुका जाहीर !!! संगमनेरसह राज्यातील 92 नगरपरिषदांच्या तर 4 नगरपंचायतींचा समावेश

अगोदर कोरोना नंतर ओबीसी आरक्षण आणि आता पावसामुळे रखडलेल्या राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या निवडूका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत त्यानूसार 18 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये संगमनेर नगरपरिषदेचाही समावेश असल्याने तब्बल सात महिण्यांनंतर नगरपरिषदेतील प्रशासकीय राज संपणार आहे. त्यामुळे इच्छूकांमध्ये लगबग सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागु झाली आहे.

महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसेच, 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीच्या प्रक्रियेला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहे. त्यानंतर, 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.


अ वर्गातील 6 नगरपरिषदा
भुसावळ
बारामती
बार्शी
जालना
बीड
उस्मानाबाद


ब वर्गातील नगरपरिषदा
मनमाड
सिन्नर
येवला
दौंडाईचा- वरवाडे
शिरपूर- वरवाडे
शहादा
अंमळनेर
चाळीसगाव
कोपरगाव
संगमनेर
श्रीरामपूर
चाकण
दौंड
कराड
फलटण
इस्लामपूर
विटा
अक्कलकोट
पंढरपूर
अकलूज
जयसिंगपूर
कन्नड
पैठण
अंबेजोगाई
माजलगाव
परळी-वैजनाथ
अहमदपूर
अंजनगाव- सुर्जी


क वर्गातील नगरपरिषदा
कोल्हापूर
कुरुंदवाड
मुरगुड
वडगांव
औरंगाबाद
गंगापूर

संपूर्ण वृत्त थोड्याच वेळात ….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख