अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
1384

जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

संपूर्ण राज्यात गेली 4 डिसेंबर पासून अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शुक्रवारी राज्यातील लाखो अंगणवाडी महिला कर्मचारी नागपूरच्या विधान भावनावर मोर्चा धडकणार आहे. आणि शासनाला आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडणार आहे. जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर हा संप बेमुदत चालू राहील आणि शासनाला जेरीस आणून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्ष निशाताई शिवूकर यांनी दिला.

युवावार्ता (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

संगमनेर शहरातील नेहरू गार्डन येथून अंगणवाडी सभेच्या राज्याध्यक्ष निशाताई शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा संगमनेर नगरपालिका, बाजारपेठ, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक मार्गे नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालय येऊन धडकला. मानधन नको वेतन हवे, महागाई वाढली मानधन वाढवा, दरमहा पेन्शन मिळालीच पाहिजे, अंगणवाडी सभेचा विजय असो अशा घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी. अंगणवाडी सेविकांना 26 हजार तर मदतनीसना 20 हजार मानधन मिळावे. धर्मा पेन्शन योजना आणि निवृत्तीवेतन योजना मंजूर करावी. तसेच सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी मिळावा, आहाराच्या दारात वाढ करावी, मिनी अंगणवाड्यांना पूर्ण अंगणवाड्यांचा दर्जा द्यावा आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, संगमनेर तालुकाध्यक्ष भारती धरत, आशा खरात, माया बागुल, सुनंदा राहणे, रुपाली कागणे, संगीता कुदनर, अनिता दातीर, सोनाली पवार, संगीता बोडखे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here