पठार भागात गारपीटीने शेती उध्वस्त

0
1717
गारपीटीने शेती उध्वस्त


संगमनेरातही कोसळला मुसळधार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – हवामान विभाग व पंजाबराव डख यांनी नोंदीविलेल्या अंदाजानुसार आज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर, वरूडीपठार, खंडेरायवाडी या भागात जोरदार गारपीट झाली. या गारपीटीने येथील टोमॅटो, कांदा पिके भुईसपाट झाली. तर संगमनेरातही काहीवेळ मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे आज शनिवारी आठवडे बाजारात दाणदाण उडाली.
दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान अभाळ भरून आले होते. दुपारी 2 वाजेच्या नंतर पठार भागातील साकूर सह परिसरातील अनेक भागात जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली.

त्यानंतरच काही वेळात जोरदार गारपीट होऊ लागली. पावसाबरोबर पडणार्‍या गारांनी परिसरावर पांढरे शुभ्र अच्छादन पसरले. शेती पिके या गारपीटीने उध्वस्त झाली. नाशिक-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या गारांमुळे परिसराला काश्मिरचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे काहीकाळ महामार्गावर वाहतूकही ठप्प झाली. पठार भागात प्रामुख्याने टोमॅटोचे पीक घेतले जाते. टोमॅटोला सध्या चांगला बाजारही आहे. परंतू जवळपास अर्धातास गारांची बरसात झाल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पहिल्याच अवकाळी पावसाने शेतकरी सावरलेला नसतांना आता झालेल्या गारपीटीने तो पूर्णत: उध्वस्त झाला आहे. संगमनेर शहरात आज आठवडे बाजार भरतो. त्यामुळे नागरीकांची मोठी गर्दी असते. मात्र आज दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस कोसाळू लागल्याने नागरीकांची धांदल उडाली. बाजारातील छोटे व्यावसायिक यांचे या पावसाने मोठे नुकसान झाले. थोडाचकाळ मात्र दमदार पडलेल्या या पावसाने पूर्ण वातावरण बदलून टाकले. एकूणच गारपीट व मुसळधार पाऊस यामुळे तालुका चांगलाच झोडपून निघाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here