धनादेश न वटल्याने कर्जदारास दहा लाखांच्या दंडासह सक्तमजुरी

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणार्‍यामध्ये चपराक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
येथील संग्राम नागरी पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने मंगळवारी संगमनेरातील एका व्यावसायिकाला तब्बल नऊ लाख नव्वद हजार रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. फारुख निसार शेख असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणार्‍यामध्ये चपराक बसली असल्याने मानले जात आहे.


याबाबत माहिती अशी, संगमनेराणील नाईकवाडपुरा मधील व्यावसायिक फारुख निसार शेख यांनी त्यांचे वडिल निसार शेख यांचे नावाने संग्राम पतसंस्थेकडुन चार लाख पन्नास रुपयाचे गृह कर्ज 2014 मध्ये घेतलेले होते. आज अखेर या कर्जाची थकबाकी 21,00,794/- वर गेली आहे. संस्थेने वारंवार त्यांचेकडे कर्ज रक्कमची मागणी केल्यानंतर फारुख निसार शेख यांनी संस्थेला धनादेश वटण्याची हमी देत. 4 लाख 95 हजार रुपयाचा धनादेश पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकीपोटी दिला होता . सदरचा धनादेश न वटता परत आल्याने संस्थेने याची कल्पना शेख यांना देत पैसे न भरल्याने संस्थेने संगमनेरच्या न्यायालयात न वटणारा धनादेश देत पतसंस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी 2016 मध्ये निगोशिएबल इंन्स्ट्रमेंटस अ‍ॅक्ट कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली होती.

कर्जदार शेख याचे विरोधात धनादेश बाऊंस प्रकरणी दाखल झालेल्या या खटल्याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. दिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी. बी. देशमुख यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरु होती. फिर्यादी संस्थेचे वकील बी. के. वामन यांनी न्यायालयासमोर संस्थेची बाजु मांडत त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी न्यायालयासमोर आणल्या. तसेच व्यवस्थापक उमेश शिंदे यांची देखील या खटल्यात साक्ष नोंदविण्यात आली.
फिर्यादी संस्था आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जी. बी. देशमुख यांनी आरोपी फारुख शेख याला दोषी ठरवत दंड व सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख