अखेर दोन महिन्यांनी खुन्याला वाचा फुटली

0
2017
संकेत नवले

संकेत नवलेच्या मारेकऱ्यांना अटक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात इंजिनिअरींग शिकत असणार्‍या नवलेवाडी, अकोले येथील संकेत सुरेश नवले या तरुणाची दि. 8 डिसेंबर 2022 रोजी पहाटे हत्या करण्यात आली होती. या घटनेचा अतिशय गुप्त पध्दतीने तपास सुरू असताना आज 9 फेब्रुवारी 2023 रोजी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30, रा. पुनरवसण कॉलनी, कुरण रोड संगमनेर) अशी या दोघांची नावे आहेत. अत्यंत नाजूक व आर्थिक देवाण घेवाणीतून संकेतची हत्या कारण्यात आल्याचे या तपासातून पूढे आहे. मात्र या अटक सत्रानंतर आरोपींच्या कुटुंबियांनी आमच्या मुलांना नाहक या प्रकरणात अडकविण्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, संकेत नवले आणि आरोपी शाहरुख शेख व सुलतान शेख ही तिघे पुर्वीपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील मैत्री इतरांपेक्षा वेगळी होती. दरम्यान दि. 8 डिसेंबर 2022 रोजी आरोपींनी संकेतशी संकेतीक भाषेत संपर्क करून त्याला सुकेवाडी परिसरात भेटायला बोलावले होते. तेथे त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, तिघांमध्ये एका नाजुक कारणाहून मतभेद झाले आणि तेथेच बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर धक्काबुकी आणि नंतर शाहरुख शेख व सुलतान शेख या दोघांनी मिळून संकेतची हत्या केली. त्यानंतर हा खून लपविण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी थंड डोक्याचा वापर करून त्याला सुकेवाडी परिसरातच नेवून टाकले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी व या खूनाचा तपास लावण्यासाठी जंग जंग पछाडले. कुठेही सुगावा लागत नव्हता. या परीसरातील अनेक सीसीटीव्ही तपासले आणि यात हे संशयित आरोपींच्या हालचाली टिपल्या गेल्या मात्र ठोस काही हाताला लागत नव्हते. या आरोपींना या अगोदर दोन ते तीन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र चौकशी करून सोडून देण्यात आले. दरम्यान आजही अशीच चौकशी होईल म्हणून सदर आरोपी बिनधास्तपणे चौकशीसाठी हजर झाले. परंतु यावेळी मात्र उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाला ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे आलेल्या या दोघांना खूनाच्या गुन्ह्यात अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.


गेली दोन महिने या तपासात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली या हत्येचा एक एक धागा जोडत शेवटापर्यंत जात अखेर काही दिवस विस्मृतीत गेलेल्या हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.दरम्यान एका कॉलेज तरुणाची हत्या होते आणि पोलीस काहीच करत नाही असा आरोप करत अकोले येथील नागरीकांनी मोर्चे काढले, अंदोलने केली, अनेक संघटनांनी निवेदने दिली. पोलीस मात्र शांत डोक्याने तपास करीत होते. संकेतच्या प्राथमिक शाळेपासून ते त्याच्या कॉलेज पर्यंत आणि मित्र परिवारासह नातेवाईकपर्यंत सखोल तपास करण्यात आला. प्रत्येक गोष्टीची पार्श्‍वभुमी तपासून महत्वाचा असणारा एक एक धागा शोधून काढण्यात आला. अनेक ठिकाणी चौकशी सुरू असली तरी या आरोपींवरील पोलिसांची नजर मात्र हटत नव्हती. मात्र, त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठोस पुरावा आवश्यक होता. त्यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नव्हते. परंतु शांत बसतील ते पोलीस कसले. त्यांनी अखेर ठोस पुरावा शोधला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणारा तपास तडीस नेल्यामुळे संगमनेर, नगर, अकोले आणि संगमनेर पोलीस उपअधिक्षक पथकाचे मात्र आता कौतुक होत आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी अकोल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन घुगे यांच्यासह पोलीस उपअधिक्षक पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमित महाजन, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर विभागाचे फुरकान शेख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here