संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा व जाहीर सभा

0
1341

युवावार्ता (प्रतिनिधी) – संगमनेरकरांनी दिलेल्या प्रचंड जनसमर्थनाबद्दल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेचे आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आले आहे. शिंदे यांची ही सभा संगमनेरमध्ये आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दौऱ्यात शहरातील विविध मार्गांवर त्यांचे भव्य स्वागत सोहळे होणार असून, आमदार अमोल खताळ यांच्या महायुती जनसंपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचाही समावेश आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर नगरीत दाखल झाले असून थोड्याच वेळात जाणता राजा मैदान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. सभेसाठी सांगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी झाली असून, येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. अहिल्यानगर रोड, नाशिक रोड व अकोले-पुणे रोडमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळी पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. दोनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची सोय केली असून, अहिल्यानगर रोड, नाशिक रोड, अकोले-पुणे रोड आदी मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

महत्वाची पार्किंग स्थळे म्हणून – ज्ञानमाता विद्यालय, मेडिकव्हर हॉस्पिटल परिसर, शारदा विद्यालय, बी.एड कॉलेज, जोशी हॉटेलच्या मागील बाजूस प्रांत कार्यालय तसेच मेहेर विद्यालय, श्रमिक मंगल कार्यालय व इतर ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आपल्या मार्गानुसार दिलेल्या पार्किंग ठिकाणी वाहन उभे करून पायी सभा स्थळाकडे जावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • संगमनेरमध्ये 40 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले, जनता त्याची साक्षीदार आहे.
  • भोजापूर चारीला पाणी आणण्यात यश, निळवंडे धरण प्रश्न महायुती सरकारने सोडवला.
  • संगमनेरला एमआयडीसी मंजूर व्हावी (तरुणांसाठी रोजगार).
  • महिलांसाठी व बालकांसाठी विशेष रुग्णालय.
  • नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरमार्गे यावा.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा व निधी.
  • आरटीओ कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र, रिंगरोड व अंतर्गत रस्त्यांची मागणी.
  • संगमनेरमध्ये पर्यटन विकासासाठी प्रयत्न (शहागड, पेमगिरी विकास).

एकनाथ शिंदेंची संगमनेरात तुफान फटकेबाजी

  • निवडणुकीची काळात मी विखे पाटील यांना सांगितलं अमोल खताळ यांच्या पाठीशी उभे रहा, आणि त्यांनी अमोल खताळ यांना निवडून आणले.
  • महायुती ही बोगद्यातून साखर पळवणारी नाही
    • ज्यांनी 40 वर्ष पाणी दिले नाही त्यांना आमदार अमोल खताळ पिण्याचे स्वच्छ पाणी दिल्याशिवाय राहणार नाही
    • आमदार अमोल खताळ यांना सुपर जायंट किलर बनवा
    • स्थानिक स्वराज्य निवडणुका नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांची आहे
    • 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो
    • अमोल खताळ आमदार नव्हते तेव्हा पण ते संगमनेरच्या विकासासाठी काम करत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here