दुधगंगा सभासदांच्या जनआक्रोश आंदोलनाला खा. लोखंडेंची भेट

योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नामांकित दूधगंगा पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांचा घोटाळा व सभासद,ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळावे या मागणीसाठी दूधगंगा पतसंस्था संघर्ष समितीच्या वतीने शनिवार 14 आक्टोबर 2023 पासून प्रांत अधिकारी कार्यालय नवीन नगर रोड येथे जन आक्रोश आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे.
दधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित जनआक्रोश आंदोलन व उपोषणाची शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दखल घेतली आहे. या उपोषणाच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. सदाशिव लोखंडे आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष रमेश काळे, शहरअध्यक्ष सोमनाथ कानकाटे उपस्थित होते.

Dudhganga patsanstha


तसेच छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वनाथ वाघ व त्यांची टिम यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन छावा ब्रिगेड संघटनेच्या वतीने पाठींबा जाहीर केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगरचे डिवायएसपी कमलाकर जाधव, आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब राठोड, आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शेख, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव तसेच प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमोल वाघमारे, सदस्य नवनाथ बोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या विविध मागण्या विचारात घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.
दुधगंगा पथसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील 21 आरोपींसह कर्जदार व जामीनदार यांचेवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करून ठेवीदारांना ठेवी परत केल्या जातील असे अश्‍वासन देत दुधगंगा पथसंस्थेच्या संघर्ष समितीने जनआक्रोशआंदोलन व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती प्रशासनाने केली. परंतु जोपर्यंत मुख्य आरोपी असलेले संस्थेचे चेअरमन व त्यांचे कुटूंबीय या सह इतरांना अटक होत नाही तसेच कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त होत नाही तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहिल. ठेवीदारांना योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी दुधगंगा पथसंस्थेचे ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख