शेतकर्यांना माेठा दिलासा
9 प्रकारच्या सवलती शासन करणार लागू
दुष्काळग्रस्तांना कोणत्या सवलती मिळणार
1) जमीन महसूल घट 2) पिक कर्जाचे पुनर्गठण 3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती 4) कृषी पंपाच्या वीज बीलाच्या वसुलीत स्थगिती 5) शालेय व महाविद्यालयीन फी माफी 6) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता 7) आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स सुरु करणे 8) शेतकर्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे 9) राज्यात पशुधनाच्या चार्याकरीता एक लाख लाभार्थी शेतकर्यांना मुरघास वाटप केला जाणार आहे. जवळपास 5 लाख टन मुरघास वाटप करण्यात येणार आहे. यासाठी लागणार्या 30 कोटी रुपये खर्चासाठी मान्यता सुद्धा मिळाली आहे.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्र राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे होता. राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. परंतु, शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वत्र विरोध झाला. शेतकर्यांनी राज्यातील इतरही तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे सांगत राज्यभर दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी लावून धरली. केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला.
मात्र कमी पाऊस बरसलेला असतानाही राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला नसल्याने शेतकर्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी होती.
राज्य शासनाने ज्या महसूल मंडळात 750 मिमी पेक्षा अर्थातच 75% पेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा तालुक्यांमध्ये देखील आता दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासनाने 178 तालुक्यांमधील 959 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा यात समावेश करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील तब्बल 96 महसूल मंडळांमध्ये वर्तमान शिंदे सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यात नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेसावा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपुर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्रॉम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकुर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान या महसूल मंडळांचा समावेश आहे. यामुळे या परिसरातील शेतकर्यांना निश्चित शासनाच्या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
यामुळे पशुपालकांचे होणारे नुकसान टळणार आहे. एकंदरीत शासन या 9 प्रकारच्या सवलती लागू करणार आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे.