चवी बराेबरच ग्राहकांचे आराेग्यही जपते निमाई स्वीट
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दिवाळी म्हंटले की, फराळ आणि मिठाई व फराळ मिठाई म्हंटले की निमाई स्विटस्. संगमनेरसह अकोले व परिसरातील नागरीकांच्या आवडीचे आणि हक्काचे मिठाईचे दालन असलेल्या निमाई स्विटस्मध्ये मिठाई खरेदीसाठी नागरीक गर्दी करत आहे. ए -2 दुध आणि अस्सल गावठी तुुपापासून बनविलेले लाडू, बर्फी, गुलाबजाम, सोनपापडी यासह फराळाच्या अनेक पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. निमाईचे संगमनेर -अकोले रोडवरील 7 वा मैल धांदरफळ, निमाई स्वीटस् गणेश नगर संगमनेर, निमाई स्विटस् संगमनेर बसस्थानक, निमाई स्विटस् नविन नगर रोड या चारही शाखांमध्ये दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे फराळ ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अस्सल चव, अस्सल गोडवा आणि अस्सल शुद्धता यामुळे निमाई स्विटस्ला नागरीक पहिली पसंती देत आहे. दिवाळीनिमित्त भेट म्हणून नातेवाईक, अप्तेष्ट, कार्यलयीन कर्मचारी यांना भेट म्हणून देण्यासाठी सर्व प्रकारची व सर्व वजनामध्ये मिठाई उपलब्ध आहे.
दिवाळी म्हंटले की, मिठाई आणि भेसळीची शक्यता अनेक ठिकाणी आढळते. परंतू निमाई स्विटमध्ये ग्राहकांची चव जपण्याबरोबरच आरोग्य जपण्याचेही काम केले जाते. शुद्धतेचे सर्व निकष पार करून व स्वच्छतेची काळजी घेऊन तयार होणार्या या मिठाईला नागरीकांची पसंती मिळत असल्याने याचे मोठे समाधान वाटत असल्याचे निमाईचे संचालक शुभम घुले यांनी म्हंटले आहे.