संगमनेरात गंठण चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोर्‍यांचा सिलसिला कायम

chori

पाेलिसांचा वचक नसल्याने गुन्हेगारीत वाढ

नागरीकांमध्ये संताप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून बस स्थानकावरून सोन्याचे गंठण तर दिल्ली नाक्यावर घरफोडी करून वायर चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे दररोजच्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा सीलसिला सुरूच आहे. पोलीस मात्र हतबल झाल्यासारखे या घटनांकडे पहात असल्याने नागरीकांमध्ये भीती कायम आहे.
संगमनेर बस स्थानकावर होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण थांबलेले नाही. बस स्थानकातून साकुरकडे जाणार्‍या बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. कोमल किशोर साळुंखे (वय 25, रा. साकुर, तालुका संगमनेर) या महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार पारधी हे पुढील तपास करत आहेत. शहरातील दिल्ली नाका परिसरात घरफोडी झाली असून मोटार वाइंडिंगची वायरचे सहा बंडल 66 हजार रुपये किमतीचे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दिल्ली नाका येथील साई प्रवरा इलेक्ट्रिकल या दुकानातून ही चोरी करण्यात आली आहे. या दुकानाचे शटर उचकटून, दुकानात आत मध्ये प्रवेश करून मोटार वाइंडिंगची वायर चोरून नेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप बबन रहाणे (वय 29, रा. ओझर खुर्द, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे. संगमनेर शहरातील बस स्थानकावर होणार्‍या चोर्‍या बंद झाल्या नाहीत. पोलिसांकडून कुठलीही ठोस अंमलबजावणी होत नाही. वरिष्ठ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहरातून दररोज रतीब घातल्याप्रमाणे मोटरसायकलची चोरी होत आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख