Monday, June 24, 2024

कारखाना परिसरात घरफोडी


लॅपटॉपसह 10 हजारांची रोकड चोरीला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
तालुक्यातील थोरात सहकारी साखर कारखाना परिसरातील अमृतनगर येथे एका बंद घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून आज्ञात चोरट्यांनी घरातील लॅपटॉप व रोख रक्कम असा सुमारे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सहा जून दुपारी ते आठ जून दरम्यान घडली. या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी, बाळासाहेब विठोबा दातखिळे हे खाजगी नोकरी करत असून अमृत नगर मधील रूम नंबर 10/ 54 मध्ये राहत आहेत. ते सहा जून रोजी आपल्या घराला कुलूप लावून परिसरासह आपल्या मूळ गावी गेले होते. परंतु इकडे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप, कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील दहा हजार रुपये 10 हजार रूपये किमतीचा लॅपटॉप व दहा हजार रुपये रोख असा सुमारे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी बाळासाहेब दातखिळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
दरम्यान शहरातील जाणताराजा मैदान येथून मनिष किरण नेहूलकर यांच्या मालकीची 10 हजार रूपये किमतीची स्पेलंडर प्लस मोटारसायकल एमएच17 सीए 7723 ही अज्ञात चोरट्यांनी 1 जून 3 जून दरम्यान चोरून नेली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख