शस्रांचा वापर – आठ जण गंभीर जखमी
संगमनेरच्या घटनेचे जोर्वेत पडसाद
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील जोर्वे नाका परिसरात किरकोळ कारणावरून तालुक्यातील जोर्वे येथील नागरीकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तलवार, चॉपर, रॉड यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. यात आठ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे शहरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले असून या परिसरात राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. ही घटना काल रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जोर्वे नाका येथील 17 जणांसह सुमारे 150 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा पोलिसांच्या बंदोबस्तात जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी काहींनी विरोध केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते. संगमनेर येथील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते. जोर्वे नाका परिसरात हे युवक आले असता या ठिकाणी रहदारी ठप्प झालेली होती. युवकांनी आपल्या वाहनाचे हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांनी या दोन युवकांना मारहाण केली. यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर हे युवक जोर्वे येथे निघून गेले. त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर जोर्वे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.
पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर हे ग्रामस्थ जोर्वे येथे जात असताना जार्वेे नाका परिसरात एका समाजाच्या युवकांनी या नागरिकांना अडविले. या ठिकाणी जोर्वेतील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. एका समाजाच्या काही युवकांनी धारदार शास्त्रांचा वापर केला. या हाणामारीत जोर्वे येथील सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये जितेंद्र दिघे, अजित थोरात, सुमीत थोरात, तन्मय दिघे, विजय थोरात, कुंडलिक दिघे यांचा समावेश आहे.
जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याचेे समजताच जोर्वेेे येथील ग्रामस्थ रात्री उशिरा मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यात जमा झाले. आरोपींविरुद्ध त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे शहरामध्येे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचेे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित पावले उचलली. घटनास्थळी मोठा पोलीस फौज फाटा पाठवण्यात आला.शहरातील जोर्वेेे नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. आणि या अतिक्रमणधारकांची येथे मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. या अतिक्रमणामुळेच कालची घटना घडली आहे. नगरपालिका प्रशासनाने रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात या ठिकाणचे अतिक्रमण पाठविण्यात आले. या अतिक्रमणाला एका युवकाने विरोध केला. यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम काही वेळा थांबण्यात आली होती पोलिसांनी त्वरित अहमदनगर येथे घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेर शहरात त्वरित राज्य राखीव पोलीस दल रवाना केले. जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याने आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी जोर्वे येथील ग्रामस्थांनी रात्री बारा वाजता शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केले या ठिकाणी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
किरकोळ कारणावरून जोर्वे ग्रामस्थांना मारहाण करणार्यांमध्ये बाबू टपरीवाला, इम्रान वडेवाला (पुर्ण नाव माहित नाही), नदीम हुसेन शेख, इम्रान (पुर्ण नाव माहित नाही) रियाज जहीर शेख, रिक्षावाल (पुर्ण नाव माहित नाही साफिक चहावला (पुर्ण नाव माहित नाही), साफिक (पुर्ण नाव माहित नाही), इरफान (पुर्ण नाव माहित नाही) अकिल टपरीवाला (पुर्ण नाव माहित नाही), ताहिर नजिम पठाण, शाहीद वाळूवाला (पुर्ण नाव माहित नाही) मुसेफ शेख (पुर्ण नाव माहित नाही), इफू वडेवाला (पुर्ण नाव माहित नाही), अराफत रफिक शेख, इरफान वडेवाला यांचेकडे काम करणारे तीन जण (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह सुमारे 100 ते 150 अज्ञात इसमांवर रविंद्र नामदेव गाडेक (रा. जोर्वे) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी गुन्हा रजिनं. 418/2023, कलम 307, 324, 143, 147, 148, 149, आर्मअॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेरच्या घटनेचे जोर्वेत पडसाद
संगमनेर येथे जोर्वेतील काही तरूणांना गंभीर मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद आज तालुक्यातील जोर्वे येथे उमटले. आज सकाळी जोर्वे येथे चिकन व्यावसायीक असणार्या मुस्लिम इसमाची टपरी तोडून नुकसान करण्यात आले. तसेच एका इसमाला मारहाण करून त्याची दुचाकी जाळून टाकण्यात आली. या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमवून संगमनेरातील मारहाणीचा रोष व्यक्त करत दुसर्या समाजावर संताप व्यक्त करत होता. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघ चौरे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्यासह तालुका पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवत गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले.