अस्वच्छता व दुर्गंधीने प्रवासी हैराण
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरच्या विकासाचे व सौंदर्याचे प्रतिक असणार्या बसस्थानकात सध्या भिकार्यांचे बस्थान बसले आहे. यातील अनेक भिकारी हे जर्जर आजाराने त्रस्त असून त्यांच्या येणार्या दुर्गंधीमुळे व परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे येणार्या प्रवाशांना व आजूबाजूच्या व्यवसायींकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात मोठा गाजावाजा करून भव्यदिव्य असे बसस्थानक उभारण्यात आले. मात्र अल्पावधीतच वेगवेगळ्या समस्यांनी या बसस्थानकाला ग्रहण लावले. सर्व सुविधायुक्त बांधलेल्या व वाहनांसाठी अद्यायावत पार्किंग सुविधा असतांनाही बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बेशिस्त पार्किंग केली जाते.
त्याचबरोबर या बसस्थानकात भिकारी, गरिब, निराधार लोकांचे मोठे वास्तव्य आहे. अनेक महिला मुलाबाळांसह राहातात. अनेक निराधार ज्येष्ठ नागरीक यांचे हे हक्काचे ठिकाण बनले आहे. मात्र यातील काही जण गंभीर व जर्जर आजाराने त्रस्त आहे. अपंग, मतीमंद, वृद्ध भिकारी असल्यामुळे त्यांच्या शरीराचा मोठा दुर्गंध परिसरात पसरला जातो. तसेच त्यांना काही दानशूरांनी दिलेले जेवन उरल्यानंतर हे भिकारी ते तेथेच पेकून देतात. त्यामुळे या अन्नाचीही दुर्गंधी पसरते.
या बसस्थानकात रोज हाजोरो प्रवाशांची ये-जा असते. मात्र या प्रवाश्यांना भिकार्यांना ओलांडूनच बसस्थानकात प्रवेश करावा लागतो. त्यांच्या या दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून ये -जा करावी लागते. अनेकवेळा हे बेवारस भिकारी येथेच शेवटचा दम तोडतात. येथील या गंभीर समस्येकडे अद्याप पर्यंत कुणाचेही लक्ष गेले नाही. प्रत्येकवेळी किरकोळ कारवाई करून या भिकार्यांना हकलले जाते. मात्र पुन्हा दोन दिवसात जैसे थे परिस्थिती निर्माण होते. भिकार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. येथील व्यवसायिकांना तर या भिकार्यांचा त्रास नित्याचा झाला आहे. त्यामुळे बसस्थानक व्यवस्थापनाने किंवा नगरपालिकेने या भिकारी व गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरीकांची योग्य ती व्यवस्था अन्य ठिकाणी करावी अशी मागणी प्रवाशी व येथील व्यवसायीक करत आहे.