पोलीसात तक्रार केल्याने दोघांना कोयता व लोखंडी गजाने मारहाण

जीवे मारण्याची दिली धमकी

गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आरोपीविरूद्ध चोरीची तक्रार दिल्याने ही तक्रार मागे घ्यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी हे फिर्यादीला त्रास देत होते. परंतू फिर्यादी तक्रार मागे घेत नसल्याने आरोपीने व त्याच्या इतर सहा साथीदाराने फिर्यादी व त्याच्या भावाला कोयता, लोखंडी गज, टोचा व बेसबॉलचा दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी व त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नविन नगर रोडवरील मच्छी सर्कल येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शरीफखान रशिदखान पठाण (रा. सुकेवाडी रोड, माताडे मळा) हे व्यावसयाने वकील आहेत. दरम्यान त्यांनी 11/05/2023 रोजी आरोपी सादीक रज्जाक शेख याच्याविरूद्ध चोरीच्या कारणावरून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही फिर्याद मागे घ्यावी यासाठी आरोपी हे फिर्यादीवर वारंवार दबाव आणून दमदाटी करत होते. यातूनच काल शुक्रवारी सकाळी आकरा वाजता फिर्यादी व त्याचे नातेवाई यांच्याशी आरोपींनी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर शरीफखान पठाण यांनी पुन्हा याबाबत तक्रार दाखल केली. या रागातून सायंकाळी 7 वाजता आरोपी सादीक रज्जाक शेख व त्याचे साथीदार आयान सादीक शेख, इम्रान बशीर शेख, जुनेद सादीक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमुहम्मद शेख, अशफाक इब्राहीम पटेल यांनी संगनमत करून फिर्यादी व त्याच्या भावाला नवीन नगर रोड येथील मच्छी सर्कल येथे अडवून फिर्यादी व त्याच्या भावाला कोयत्याने, लोखंडी गजाने, टोचाने व बेसबॉलच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींवर गुन्हा रजी नं. 1034/2023 भादंवि 307, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख