एसटीपी प्लांट हटविण्या बाबत कृती समिती ठाम; शुक्रवारी प्रांत कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा

संगमनेर (प्रतिनिधी)
नगर पालीकेच्या तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मनमानी पद्धतीने रहिवासी भागामध्ये तेथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल हे माहित असतांनाही एसटीपी प्लांट (जन नित्सारन केंद्र) उभारण्याचा घाट घातला आहे. या विरोधात स्थानिक रहिवासी व विविध संघटनांच्या वतीने मागील 1 महिन्यापासून साखळी उपोषण केले जात आहे. मात्र तरीही या आंदोलनाकडे लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनाने ढुंकणही पाहिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी व एसटीपी प्लांट हटाव कृती समितीच्यावतीने शुक्रवार दि. 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजता येथील प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आज कृती समितीच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक इसाक खान पठाण, शौकत जहागिरदार यांनी या आंदोलनाबाबत भुमिका मांडली. यावेळी कृती समितीच्यावतीने भुमिका मांडतांना सांगितले की, नगर परिषदेद्वारे होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात घातक वायू निघणार आहे. तसेच संपूर्ण शहरातील मलमुत्र, कचरा या ठिकाणी जमा होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होणार आहे. या दुर्गंधी व घातक वायूमुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात येणारे केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे आजूबाजुच्या अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर त्याचा दुष्परीणाम होणार आहे. सदर प्लांट हा शहराबाहेर 2 ते 3 किलोमीटर असणे बंधनकारक असतांना हा प्रकल्प नागरी वस्तीत उभारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील 2 ते किलोमीटर भाग प्रभावीत होणार आहे. सुरूवातीपासून येथील नागरीकांच्या या प्लांटला विरोध नसून त्याच्या जागेला विरोध आहे. पालिकेने सदर प्लांट दुसर्‍या जागेत हस्तांतरीत करावा अशी मागणी सनदशीर मार्गाने आत्तापर्यंत करण्यात आली आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले.

जोर्वे नाका येथील या जागेवर सुरूवातीला महिलांसाठी जॉगींग पार्क, मुलांसाठी गार्डन करण्याचा ठराव नगरपालीकेत करण्यात आला होता. अशी माहिती यावेळी इसाक खान पठाण यांनी दिली. मात्र नगरपालीकेने परस्पर या जागेची निवड करून संबंधीत नगरसेवकांच्या परस्पर सह्या घेऊन संमती घेतली असा अरोप यावेळी शौकत जहागीरदार यांनी केला. लवकरच या बाबत औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जोर्वे नाका ते प्रांत कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात येणार असून यात भाजपसह अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विविध संघटना, परिसरातील नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख