राजापूरमध्ये गावठी दारूचा अड्डा उद्धस्त

0
1286

महिलेवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – तालुक्यातील राजापूर येथील हनुमाननगर येथील मोकळ्या मैदानात अवैधरित्या सुरू असणारा गावठी हातभट्टी दारूअड्डा संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने शनिवार दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास उध्वस्त कैला आहे. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना राजापूर शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह दारुअड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांना 32 हजार 500 रुपयांचे/तयार रसायन, 5 हजार रुपयांची तयार दारू, प्रचिशे रुपयांचे टिपाड असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तर पोलिसांची चाहूल लागताच विक्रेती महिला पळून गेली. याप्रकरणी महिला पोकॉ. सोमेश्वरी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवैधरित्या दारुअड्डा चालवणारी महिला मलका काशिनाथ जाधव हिच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोना. जाधव या करत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असल्याचे कारवाईवरून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here