जेवण, गिफ्ट, करमणूक, फटाक्यांची आतिषबाजी यांचे आकर्षण
संगमनेर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या लायन्स संगमनेर सफायरने यावर्षी ओम साई दिवाळी मेळ्याचे आयोजन 4 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब येथे केले आहे. कोरोनानंतर अनेकांची घरे उध्वस्त झाली, संसार उघड्यावर पडले, अनेक मुले अनाथ झाले. वंचित मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्यासाठी या ओम साई दिवाळी मेळ्याचे आयोजन करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले आहे. ओम साई दिवाळी मेळ्याचे प्रकल्प प्रमुख म्हणून गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, देवीदास गोरे, अनिरूध्द डिग्रसकर, राजेश मालपाणी, महेश डंग काम बघत असून अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखील लायन्स सफायरमधील सर्व सदस्य काम करीत आहेत.
600 वंचित मुलांसाठी या दिवशी डी.जे. नाईट, मुलांचे डान्स कार्यक्रम, डिनर, गिफ्ट, दिवाळी मिठाई आणि भव्य आतिषबाजीचे नियोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबांनी लक्ष्मी नावाच्या छोट्याशा मुलीसोबत पाण्याने दिवे लावून दिवाळी साजरी केली. ओम साई दिवाळी मेळा निमित्ताने वंचित मुलांचा दिवाळीमधील आनंद द्विगुणीत होणार आहे.
आपणही या सामाजिक कार्यात सहभागी व्हा
600 मुलांच्या या दिवाळी मेळ्याचा खर्च साधारणपणे 4 लाखांपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पात इच्छुकांनी योगदान करावे असे आवाहन खजिनदार कल्पेश मर्दा यांनी केले आहे. संपर्कासाठी – मोबाईल 9822358346