थोरात कारखान्याकडून 10 लाख 85 हजार मे. टनाचे ऊस गाळप – आमदार थोरात

ऊस उत्पादकांनी एकरी उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा

थोरात कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा सांगता समारंभ संपन्न


संगमनेर (प्रतिनिधी)– कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 लाख मेट्रिक टन ऊस निर्मिती केल्याने उत्पादन खर्च कमी होऊन अर्थव्यवस्था चांगली होईल. डेव्हलपमेंट विभाग व ऊस उत्पादक यांनी एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी भर द्यावा असे आवाहन करताना दुष्काळी परिस्थितीतही थोरात सहकारी साखर कारखान्याने 10 लाख 85 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप केले असल्याचे गौरवउद्गार मा. कृषी व महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 24 या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष व कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा. खेमनर, आर. बी. राहणे, व्हा.चेअरमन संतोष हासे, हिरालाल पगडाल, संपतराव डोंगरे ,सुधाकर जोशी , इंद्रजीत भाऊ थोरात,रामहरी कातोरे , हौशीराम सोनवणे, नवनाथ आरगडे, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन विजयराव दंडवते, विक्रांत दंडवते, गणपतराव सांगळे ,सौ अर्चनाताई बालोडे, अविनाश सोनवणे, ॲड.रामदास शेजुळ, सौ मीराताई शेटे, सौ निर्मला राऊत आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, चालू वर्षे हे दुष्काळाचे वर्ष आहे या परिस्थितीतही कारखान्याने दहा लाख 85 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप केले आहे. यापुढील काळात कार्यक्षेत्रात 10 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे याचबरोबर एकरी जास्तीत जास्त उत्पादन होण्याकरता सर्व शेतकरी बांधव व कारखान्याच्या डेव्हलपमेंट विभागाने काम करावे. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन कारखान्याची अर्थव्यवस्था चांगली झाल्याने शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव देता येईल.

सहकारी उद्योगांमध्ये अनेक निर्बंध असतात तसे निर्बंध खाजगीकरणात नाहीत. सरकारने साखर, कांदा ग्राहकांना स्वस्त दराने द्यावा. मात्र शेतकऱ्यांना मारून नको. तर अनुदानाच्या रूपाने द्यावा. शेतकरी हा कायम अडचणीत असून त्याला सरकारने मदत केलीच पाहिजे.

निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी आल्यामुळे काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र या पाण्याचे नियोजन चांगले होणे गरजेचे आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आगामी काळात काम करावे लागणार असल्याचे ही ते म्हणाले

तर बाबा ओहोळ म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहा लाख मेट्रिक टनाच्या पुढे गाळप करणे हे सांघिक काम आहे. दुष्काळी परिस्थिती 11.50% रिकवरी कारखान्याने मिळवली असून 10 कोटी 51 लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे.

तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती ही न डगमगता कारखान्याने चांगले गाळप करताना वीज निर्मितीसह अमृत शक्ती खत व इतर उपपदार्थांची निर्मिती केली असल्याचे ही ते म्हणाले.

याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग ,रमेश गुंजाळ ,रोहिदास पवार ,मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले ,भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, संपतराव गोडगे,अनिल काळे, विनोद हासे, सौ मंदाताई वाघ, मीराताई वर्पे, संभाजी वाकचौरे, सुभाष सांगळे, विक्रांत दंडवते, सुरेश झावरे, सुरेश थोरात विष्णुपंत रहाटळ, ॲड सुहास आहेर ,ॲड उदय ढोमसे, सेक्रेटरी किरण कानवडे यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केली तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

 यावेळी कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकरी ऊस उत्पादक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख