गोतस्करांचा दोन गोरक्षकांना चिरडून मारण्याचा प्रयत्न

0
1795

आश्‍वी (दैनिक युवावार्ता) प्रतिनिधी
गोवंश तस्करी व गोवंश हत्या राज्यात बंदी असताना संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश वाहतुक व कत्तलखान्यातुन गोवंश हत्या केली जात आहे. हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल या विरुद्ध वारंवार आवाज उठवत असतानाही गोतस्करी व गोवंश कत्तल सुरुच आहे. हिंदुत्ववादी संघटना याविरुद्ध आवाज उठवत असल्याने गोतस्करांकडून त्यांच्यावर हल्ले होत आहे. दरम्यान शुक्रवार 09 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दोन वासरांना घेवून जात असणार्‍या वाहनाला दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने आडविल्याने या वाहनचालकाने थेट त्यांच्या अंगावर गाडी घालुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, यात राहता तालुक्यातील गोगलगाव येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे ही घटना संगमनेर तालुक्यातील औरंगपुर शिवारात घडली. या प्रकरणी आश्‍वी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रज्वल दत्तात्रय चौधरी व त्याचा चूलत भाऊ सागर विलास चौधरी हे दोघेही बजरंग दलाच्या माध्यमातुन गोवंश रक्षणाचे काम करत असतात.

प्रज्वल व सागर हे दोघे आपल्या बजाज प्लॅटिना दुचाकीवरुन निमगाव जाळी गावातून औरंगपूर रोड ने आपल्या घरी गोगलगाव येथे जात होते. यावेळी औरंगपूर शिवारात पाटाच्या कडेन टाटा कंपनीची तांबड्या पिवळ्या रंगाची गाडी नंबर एम.एच 20 इजी 9483 ही पुढे जात होती. या गाडीत दोन गावरान जातीच्या गाया व चार वासरे होती. शंका आल्याने प्रज्वल व सागर यांनी या गाडीला थांबवून त्यांनी गाडी आडवी लावत या बाबत विचारणा केली. गाडीत समद गनी मोहम्मद शेख रा. आश्‍वी, ता.संगमनेर व साहिल सय्यद होता. गोवंश बाबत विचारल्याचा राग आल्याने चालक समद शेख याने थेट या दोघांच्या अंगावर गाडी घातली. काही फुट या दोघांना फरफटत नेल्याने प्रज्वल व सागर हे दोघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना तश्याच अवस्थेत सोडून तस्कर तेथून पसार झाले. याप्रकरणी आरोपी समद गनी मोहम्मद शेख व साहिल सय्यद यांच्यावर आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश तस्करी, कत्तलखाने व त्यातुन वाढणारी गुन्हेगारी हा तालुक्यासाठी मोठा गंभीर विषय बनला आहे. अपुरी पोलीस यंत्रणा, दुर्लक्ष करणारे अधिकारी यामुळे बजरंग दल व हिदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलीसांना सहकार्य म्हणून गोवंश तस्करी रोखण्यासाठी मदत करत असतात. त्यांच्यावर आता हल्ले होऊ लागल्याने त्यांचा ही जीव धोक्यात आला आहे त्यामुळे अश्या गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here