पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत डॉ. शांताराम निघुते व त्यांच्या पत्नी डॉ. नीलिमा यांच्यावर झाला होता गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बेकादेशीर गर्भपात करून पिसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खटल्यातून येथील डॉ. शांताराम निघूते व डॉ. नीलिमा निघूते यांची येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.डॉ. निघुते यांच्या प्रसुती रूग्णालयात बेकायदा लिंगनिदान चाचणी व गर्भपात केला जात असल्याची तक्रार तत्कालीन जिल्हाधिकार्यांना मिळाली होती. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने तत्कालीन प्रांताधिकारी, तहसीदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निघुते यांच्या रूग्णालयावर छापा टाकला होता. या कारवाईत काही संशयास्पद औषधे व कागदपत्रे आढळून आल्याने त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याची चौकशी सुरू होती. या संदर्भातील निकाल नुकात जाहीर झाला.
पाच वर्षांपूर्वी जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरुन पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत डॉ. शांताराम निघुते यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. नीलिमा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणांनी पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. मात्र नंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही गुन्हे एकत्रित करण्याचे आदेश दिले होते. सेशन कोर्टाने 28 जुलै रोजी केलेल्या सुनावणीत डॉ. निघूते यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना या खटल्यातून निर्दोष घोषित करण्यात आले आहे. डॉ. निघुते यांच्या वतीने पुणे येथील अॅड. मिलिंद साळुंके यांनी बाजू मांडली. संगमनेर येथील अॅड. यादव हासे आणि अॅड. बाबासाहेब गायकर यांनी त्यांना सहकार्य केले.
दरम्यान संगमनेरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहे. यात मोठ्या रूग्णांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळून या अवैध तपासण्या केल्या जात आहे. यात अनेक मोठे हॉस्पिटलही असल्याची शंका व्यक्त केली जात होती.