शिर्डी लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांचे अर्ज दाखल

0
1456

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी लोकसभा मतदारसंघात (38) सोमवार 22 एप्रिल 2024 रोजी तीन उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर 8 व्यक्तींनी 10 नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना) यांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली. चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र असे तीन उमेदवारांनी आजच्या दिवशी 5 अर्ज दाखल केले. तर महायुतीचे (शिवसेना-ठाकरे) उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या आगोदरच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सदाशिव लोखंडे दाम्पत्याकडे 16 कोटींची संपत्ती

युवावार्ता(प्रतिनिधी)
शिर्डी – शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे व त्यांच्या पत्नीकडे आलिशान वाहने व सोने नाण्याच्या दागिन्यांसह स्थावर मालमत्ता मिळून 16 कोटीहून अधिक संपत्ती आहे. खेमानंद अ‍ॅण्ड कंपनीमध्ये लोखंडे यांचे दीड कोटी रुपयांचे भाग भांडवल आहे.
उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या विवरणानुसार कार, दागदागिने, मुंबई स्थित इमारतीतील मिळकती व कंपन्यांमधील भाग भांडवलामध्ये त्यांनी गुंतवणूक आहे. स्वतः लोखंडे यांच्याकडे दोन कोटी एक लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी सौ. मंदा यांच्याकडे दोन कोटी 47 लाख 56 हजार 938 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वसंपादित स्थावर मालमत्तेची किंमत 11 लाख 22 हजार 728 रुपये आहे. पत्नीकडे 3 कोटी 89 लाख 68 हजार 451 रुपयांची मालमत्ता आहे. लोखंडे यांची खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी, साई खेमानंद अ‍ॅग्रो आणि खेमानंद अ‍ॅण्ड कंपनीत दीड कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या शपथपत्रा नुसार लोखंडे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. खा. लोखंडे यांच्या पत्नी मंदा लोखंडे यांच्याकडे कार, सोने-नाणे, रोख रक्कम आदीसह 12 कोटी 14 लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. तर खा. लोखंडे यांच्याकडे 4 कोटी 69 लाख रुपयांची संपत्ती आहे.

भाऊसाहेब वाकचौरे सहा कोटी संपत्त्तीचे मालक

युवावार्ता (प्रतिनिधी)-
शिर्डी – शिर्डी लोकसभा मतदार संघातून ठाकरेे सेनेकडून माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यानी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यांच्याकडे 23 लाख 52 हजार तर पत्नीकडे 46 लाख 8 हजार रुपये रोख रक्कम आहे, वाककचौरे पती-पत्नीकडे स्थावर व जंगम मालमत्ता जवळपास 6 कोटींची आहे.
भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे 50 तोळे सोने व 5 किलो चांदी आहे. याचे सध्याचे बाजारमुल्य 33 लाख 12 हजार रुपये आहे. वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती यांच्याकडे 50 तोळे सोने व अडीच किलो चांदी आहे. त्याची किंमत 31 लाख 35 हजार रुपये आहे. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचे उत्पन्न 9 लाख 56 हजार 406 इतके होते. ते 2024 मध्ये 9 लाख 80 हजार 660 तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 8 लाख 750 हजार 893 वरुन 35 लाख 35 हजार 980 इतके झाले. त्यांच्याकडे 14 लाख 50 हजाराची चारचाकी वाहन आहे. वाकचौरे यांनी 1 कोटी 24 लाख 56 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीने 1 कोटी 59 लाख 65 हजार 474 रुपये हातउसणे दिले आहेत. वाहने, सोने चांदी, बचत जंगम स्थावर मालमत्ता जमिनीचे बाजारमुल्य वाढण्याऐवजी घटले. मागील तीन निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रानुसार वाकचौरे यांची निमगाव कोर्‍हाळे येथे 40 आर जमीन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here