
पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप
सदर वादग्रस्त महिलेचे अनेक प्रताप संगमनेरकरांना माहीत असताना आता या महिलेने थेट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप केले आहे. माझ्याकडे नको त्या गोष्टीची मागणी पोलीस निरीक्षक करतात. मी त्याला नकार दिल्याने मला बदनाम करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करावी अन्यथा मी स्वतः चे काही बरे वाईट करेल असा इशारा तीने दिला आहे. मात्र सदर महिलेचे अनेक प्रताप पहाता तीच्या या आरोपात किती तथ्य आहे हे चौकशीतून बाहेर येई.
जातीवाचक शिविगाळ करत केला अपमान
सदर महिलेने जावेद हबीब या सलून चालकावर गुन्हा दाखल करीत गंभीर आरोप केले आहे. गुन्हा दाखल तरुण मुस्लिम समाजाचा असल्याने सुरवातीला या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा देखील प्रयत्न झाला. परंतु शहरातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा देखील प्रयत्न झाला. यात काही जणांचा देखील सहभाग असल्याचे बोलले जात असून सध्या शहरात या प्रकरणाच्या चर्चेला व जुन्या किश्यांना उधाण आले आहे.
संगमनेर (प्रतिनिधी)
वेगवेगळ्या प्रकारामुळे नेहमीच चर्चेत व वादात राहणार्या शहरातील एका महिलेवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहातील जावेद हबीब या सलुन दुकानामध्ये केस कलर करण्यासाठी गेलेल्या या महीलीने तुमचा हा धंदा करण्याची लायकी नाही. असे म्हणत दुकानातील एका कर्मचार्याला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी ब्युटी पार्लर चालवणार्या 35 वर्षीय महिलेवर हा गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील जावेद हबीब सलुनचे मालक आशिष सुनिल महीरे यांनी याबाबत फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, मंगळवार दि.09 रोजी दु.3.30 वा. वाजण्याचे सुमारास सगमनेरमध्ये जिम करीत असताना त्यांना सलुन मधील स्टाफने फोन करुन सांगितले की, नेहमीचे कस्टमर कृष्णा सारडा नामक महिला सलुनमध्ये येवुन भांडण करीत आहे. तुम्ही लवकर या. दरम्यान कृष्णा सारडा यांचे स्वत:चे पार्लर असताना देखील त्यांनी या पुर्वी देखील हेअर वॉश व हेअर कलरींग करुन पैसे देण्यावरुन वाद केलेले आहेत. तसेच तुमचे सलुन चांगली सर्विस देत नाही, मी तुमच्यावर कारवाई करेल असे अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत. तुमचे दुकान बंदच पाडते, तुम्ही मला अजुन ओळखले नाही अशी धमकी सुद्धा दिली. त्याच वेळी तुम्ही मारवाडी नसताना असा धंदा कुणाच्या परवानगीने करता? कृष्णा सारडा मोठमोठ्याणे ओरडत व स्टाफला अर्वाच्च शिविगाळ करीत होती. त्यावेळी अशिष यांनी चौकशी केली असता महीला स्टाफने सांगितले की, कस्टमर कृष्णा सारडा या हेअरवॉश करण्यास आल्या होत्या. त्यावेळी आम्ही तिचे हेअर वॉश करण्यास गेलो असता तिने आम्हास थांबवुन शाकीब यास हेअर वॉश करण्यास घेवुन गेली होती व आता आम्हाला शिविगाळ करीत आहे. कृष्णा सारडा या शाकीब यास म्हणाल्या की, मला समजले की आहे की तुम्ही दुसर्या समाजाच्या मुलांना कामाला ठेवले आहे. त्यांनाना लगेच हाकलुन लावा. असे सांगत जोरजोराने ओरडत होती. त्यावेळी आशिष यांचा मित्र व स्टाप तीला समजावून सांगत होता. परंतु ती ऐकणायाच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी आशिष यांनी कृष्णा सारडा यांना विश्वासात घेउन नक्की काय झाले ते सांगा असे विचारले असता, कृष्णा सारडा यांनी उलट आम्ही मारवाडी आहोत. आमचे धंदे असताना तुम्ही महारडे हे सलुनचे धंदे करायला लागले काय? तुम्ही तुमची लायकी विसरले काय? तुम्हाला तुमची लायकी दाखवते… मुले बोलावून घेवुन तुमची सलुन बंद करुन टाकते. असे म्हणून जातीवाचक शिविगाळ करीत अपमान केला.
त्यानंतर ती तेथून तिथुन निघुन गेली. दरम्यान कृष्णा सारडा हिचे स्वःताचे सलुन असताना देखील इतर सलूनमध्ये नेहमी वाद घालत असते. कृष्णा यांनी या सलुनमध्ये पुर्वी अनेक वेळा वाद घातलेले आहे. सलुनची बदनामी करण्यासाठी तिने हा प्रकार केला असल्याचा आरोपही या फिर्यादीत केला आहे.
या एकुण प्रकरणात आशिष सुनिल महिरे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा सारडा यांच्यावर गु. र. न. 362/204 भादवी कलम 323,500,504, 505 (2), 506 सह अ. जा. ज. अ. प्र. का. क 3(1) (आर) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहे.