कारवाई नियमित असेल तरच बेशिस्त वाहतुकीला आळा बसेल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर बसस्थानकातील शॉपिंग कॉम्पलेक्सच्या तळघरात पार्किंग सुविधा असतांनाही वाहन चालक आपली दुचाकी व चारचाकी वाहने बसस्थानक आवारात उभी करतात. या ठिकाणी कोणी मंत्री अथवा व्हीआयपी आले तरच या वाहनांचे अतिक्रमण काढले जाते. इतर वेळी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. येथील अतिक्रमण हटाव मोहिम बसस्थानक प्रशासन, पोलीस व नगरपालीकेने संयुक्तपणे सातत्याने राबवावी अशी मागणी येथील व्यापार्यांनी केली आहे.
प्रशस्त बसस्थानक आवारातील मोकळ्या मैदानात आपली वाहने उभी करून ठेवताता. तसेच काही वाहनचालक वाहन ठेऊन परगावी प्रवास करतात. त्यामुळे याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होऊन इतर ग्राहक व व्यापार्यांना त्याचा मोठा त्रास होतो. दरम्यान काल पालकमंत्री बसस्थानक आवारात येणार असल्याने अतिक्रमण विभागाच्या पथकाने येथील उभी वाहने क्रेनच्या सह्याने टो करून जप्त केली. नंतर या वाहन चालकांकडून दंड वसूल करून वाहाने ताब्यात दिली. अशा प्रकारची कारवाई नियमित सुर ठेवावी तरच या बेशिस्त वाहतुकीला आळा बसेल.