अन्याय निर्मूलन लढ्यासाठी घेतली महासंचालकांची भेट

छाया – प्रसाद सुतार,

माहिती महासंचालक जयश्री भोज यांना दिले मागण्यांचे निवेदन
युवावार्ता (प्रतिनिधी)

मुंबई – ’निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान‘ या प्रसिद्धी योजनेच्या जाहीराती लघु संवर्गातील वृत्तपत्रांना मिळाव्यात म्हणून महाराष्ट्रातील संपादक शिष्टमंडळाने माहिती महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेतली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई व प्रेस कौन्सील ऑफ महाराष्ट्र, मुंबई या संस्थांच्यावतीने जाहिरात मिळण्यासंबधीचे निवेदन देत असतांना याप्रसंगी उजवीकडून दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, दैनिक तुफान लोकशाहीचे संपादक इलियास खान, संपादक बी. डी. गायकवाड, संपादक बाबा रामटेके, संपादक वाघमारे, दैनिक युवावार्ताचे मुंबई प्रतिनिधी राजाभाऊ कांदळकर व प्रेस फोटोग्राफर प्रसाद सुतार उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख