सत्यजीत तांबे काँग्रेसमधून निलंबीत

सत्यजीत तांबे

तांबे शुक्रवारी भुमिका करणार जाहीर

शुभांगी पाटील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार

युवावार्ता (प्रतिनिधी) नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता मोठी रंगत आली आहे. काँग्रेसने या मतदार संघाच्या निवडणुकीसाठी डॉ. सुधीर
तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर नाट्यमय घडामोडी होत त्यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ उडाला. पक्षाने ज्यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यांनी माघार घेतल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलीच पण सत्यजित तांबे यांच्याबंडखोरीवर देखील पक्षाने आता कारवाई केली आहे. काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे पक्षातून निलंबन केले आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पटोले यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रीत निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मविआने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे.



नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला मी काँग्रेसचाच उमेदवार असल्याचे सांगितले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे माझे मित्र आहेत, मी भाजपकडे देखील पाठींबा मागणार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी पक्षाने सत्यजित तांबे पक्षाचे उमेदवार नसल्याचे त्यावेळी जाहीर केले. दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेस आणि मविआमध्ये देखील चर्चांचे मोठे घमासान झाले. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल मतमतांतरे झाली. दरम्यान पक्षाने सुधीर तांबे यांचे निलंबन केले. त्याचवेळी सत्यजित तांबे यांनी देखील आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोंडींवर सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मात्र अद्याप कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. त्याबाबत पटोले म्हणाले की, थोरात हे आमचे नेते असून ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी नंतर चर्चाकरुन त्यांची भूमिका काय आहे पाहू. मात्र सध्या सत्यजित तांबे यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख