अमृतवहिनीच्या माजी विद्यार्थ्यांचा दिल्लीमध्ये स्नेहमेळावा

माजी विद्यार्थ्यांचा अमृतवाहिनी संस्थेला अभिमान – सौ. शरयू देशमुख

संगमनेर (प्रतिनिधी)–मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला मोठा लौकिक निर्माण केला असून या सर्व माजी विद्यार्थ्यांचा अमृतवाहिनी संस्थेला सदैव अभिमान असल्याचे गौरवोद्गार विश्वस्त सौ शरयुताई देशमुख यांनी काढले असून दिल्लीमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असून उच्चपदस्तपद विद्यार्थ्यांनी गुणवत्तेने दिल्लीत अमृतवाहिनीच्या डंका निर्माण झाला आहे.नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटेड सेंटर येथे अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, डॉ. जे बी गुरव ,प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, उद्योजक संजय दिघे, समन्वयक प्रा.शेखर सुर्वे, प्रा.प्रशांत वाकचौरे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1978 मध्ये सुरू केलेल्या अमृतवाहिनीतील अनेक विद्यार्थी युरोप अमेरिका ऑस्ट्रेलियासह भारतात उच्च पदस्थ पदावर कार्यरत आहेत. दिल्लीमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत असून या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कृतज्ञता सोहळा साजरा केला यावेळी हरियाणा मधून शरद शर्मा, अजय ओबेराय ,राकेश कुमार गुप्ता यांच्यासह गुडगाव पंजाब ,दिल्ली या परिसरातील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ.देशमुख म्हणाल्या की, माजी विद्यार्थी हे अमृतवाहिनीचे अभिमान आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते यशस्वीपणे काम करत आहेत ग्रामीण भागातून येऊन दिल्ली सारख्या मोठ्या शहरात त्यांनी प्रशासनात मोठी पकड निर्माण केली आहे या सर्वांचा अमृतवाहिनी संस्थेला सदैव अभिमान आहे.यावेळी आयएफएस पदावर असलेले हितेश राजपाल यांनी आपल्या यशाचे श्रेय हे अमृतवाहिनीलाच असल्याचे सांगितले तर माजी विद्यार्थी आजय ओबेराय ,राकेश कुमार गुप्ता या यशस्वी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे बी गुरव यांनी केले तर शिखर सुर्वे व प्रशांत वाकचौरे यांनी या मेळाव्याच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतलेया सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,डॉ. जे बी गुरव, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, प्रा. विवेक धुमाळ यांसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख