तरुणाई ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात

जीएसटीसाठी सरकारचेही जुगाराला प्रोत्साहन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – जंगली रमी पे आओ ना महाराज असे म्हणत अनेक सेलिब्रिटी (अभिनेते) तरुणाईला ऑनलाईनच्या जाळ्यात ओढत आहे. आकर्षक जाहिरात, लगेच खात्यात पैसे आणि हातात अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल यामुळे तरुण पिढी या ऑनलाईन जुगाराच्या खेळात अडत आहे. या खेळामुळे अनेक जणांच्या नोकर्‍या गेल्या किंवा नोकरीची संधी गमावत आहे. दुसरीकडे गृहकलह देखील वाढला आहे. मात्र सरकारला या खेळातून मोठ्या प्रमाणावर जीएसटी मिळत आहे, दुसरीकडे तरुण यात गुरफटून जात असल्याने त्याचे सरकारच्या कारभाराकडे लक्ष नाही त्यामुळे सरकार चिंतामुक्त होत असल्याने या गंभीर समस्येकडे सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.


क्रिकेट शौकिनांसाठी ऑनलाईन टिम तयार करून त्यावर बेटिंग करण्यापासून सुरू झालेला ऑनलाईन जुगाराचा खेळ आता तीन पत्ती, रमी अशा जुगारा पर्यंत गेला आहे. नामांकित क्रिकेटपट्टू अभिनेते या जुगाराची जाहिरात करत असल्याने अनेक लहान मुले, तरूण या खेळाला बळी पडत आहे.
सुरुवातीला रमीवाल्या लोकांकडून तुम्हाला खरोखर हजार दोन हजार रुपये जिंकून दिल जातात. मधेच पाचशे रुपये हरवून ते काढून पण घेतात. जसे उंदराला मांजर खेळवतो…आणि शेवटी मारतो तसे हे लोक करतात. पाच हजार द्यायचे, एक हजार परत घ्यायचे. पुन्हा चार द्यायचे, पाचशे घ्यायचे! असं करत तुम्हाला हळूहळू त्यात गुंतवून टाकले जाते. एकदा का पंचवीस ते पन्नास हजारला तुम्हाला अडकवले की त्यांचे काम सोपे होते. तुम्ही प्रमोशन होऊन वरच्या क्लास मध्ये एंट्री केली. इथं तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त दराने पैसे रिटर्न मिळवण्याची संधी आहे. असे सांगितले जाते. मात्र त्यासाठी पूर्वी सारखे हजार पाचशे रुपये तुम्हाला लावता येणार नाहीत तर दहा हजारच्या पटीत लावावे लागतील. आणि तिथंच तुम्ही मोहात पडता. कारण दहा लावले तर तासाभरात पंधरा रिटर्न मिळणार हे गाजर तुमच्यासमोर ठेवलले असते. आणि गंमत म्हणजे तिथेही पुन्हा त्यांचा तोच खेळ सुरु होतो. आणि मग पाहता पाहता तुम्हाला लाख, दोन लाख, चार लाख अशा मोठ्या रकमेने लुटले जाते. आणि त्यावेळी तुम्ही जागे होता. मग कळते की आपण मोठ्या खड्ड्यात पडलो. कुणाला सांगताही येत नाही आणि ज्यांच्याकडून उसने पैसे घेऊन रमी खेळली ते लोक आता तुमची कॉलर धरायला पुढे येतात. शेवटी जगणे नकोसे होते आणि आत्महत्येचा विचारात तुम्ही जातात. या खेळाला केवळ अशिक्षित नाही तर अनेक शिक्षित, आयटी इंजिनियर, शिक्षक बळी पडल्याचे पहायाल मिळते. आता पर्यंत अनेक तरूण या ऑनलाईन व्यसनापाई कर्जबाजारी होऊन समजाचे स्थान गमवून बसले आहे.
जुगार हा पुर्वीपासून चालत आलेला खेळ आहे. परंतू काळानारूप त्यात मोठे बदल झाले. झाडाखाली करमणूक म्हणून किंवा दहा ते वीस रूपयांवर पत्ते खेळणार्‍या सर्व सामान्य नागरीकांवर सरकार जुगार अ‍ॅक्ट कायदा लावते. मात्र तरूणांना ऑनलाईन जुगाराचे व्यसन लावून त्यावर जीएसटी घेणार्‍या सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख