शांतता बैठकीत अशांतता कायम

0
684

दोन मंडळाचा वाद पेटला, परस्पर विरोधी तक्रार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरात आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अप्पर समोरच दोन मंडळाचा वाद पेटून राडा झाल्याचा प्रकार पाहावयास मिळाला. त्यामुळे अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत येथून पुढे कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा दिला. तर या प्रकारानंतर बैठकीत गोंधळ घालणार्‍या काही जणांवर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या शांतता समितीच्या बैठकीला वेगळेच वळण मिळाले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (दि.22) संगमनेर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात गणेश मंडळे आणि शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्याम मिसाळ, महावितरणचे खैरनार आर्दिसह विविध मंडळांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी वे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मागील वर्षीच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी वाचल्या. मात्र, गोंधळ सुरू होताच ही शांतता समितीची बैठक आहे त्यात गडबड होत असेल तर काही उपयोग नाही. कोणाची दादागिरी खपून घेतली जाणार नाही.

आपल्याला गणेशोत्सव शांततेत साजरा करायचा आहे. याकाळात कोणतेही गैरकृत्य करू नका. कारण जर गुन्हे दाखल झाले तर पुढील पाच वर्षे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिस्त पाळा. गेल्यावर्षी बारा बाजता आपण मिरवणूक बंद केली होती. आता आपण विसर्जनत्ची वेळ ठरवून घेऊ. आपल्या मंडळाची जागा वादग्रस्त नुसावी, फलक बादग्रस्त नसावे, देखावा हा एखाद्या व्यक्तीचा अनादर करावा नसावा, वीजजोडणी अधिकृत घ्यावी जेणेकरून एखादी घटना घडणार नाही, गणेशमूर्तीची उंची कमी ठेवावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. तसेच गणेशोत्सव काळात स्टंटबाजी करणार्‍यांवर थेट कारवाया कराव्यात, अशा सूचना देखील त्यांनी शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिल्या. डीजे न लावता पारंपरिक वाद्य वाजवावे, लेझर लाईट्स असणारे डीजे असेल तर तेथेच जप्त करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

चैतन्यनगर परिसरातील दोन गणेश मंडळांमध्ये झालेल्या वादामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. एका मंडळाच्या पदाधिकार्‍याने दुसर्‍या मंडळावर आरोप केला, यामुळे संतप्त झालेले माजी नगराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक त्या पदाधिकार्‍याकडे धावून गेले. त्यामुळे सभागृहात ओरडाआरड झाली. तर कैलास वाकचौरे, अमर कतारी, शिरीष मुळे, किशोर पवार, दिपक साळुंखे, निखील पापडेजा यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रशासनाला प्रश्‍न विचारत हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here