अमर कतारी यांचा शहरात डोअर टू डोअर प्रचार
पदाधिकारी ग्रामीण भागात घालतात साद
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेते असून राज्यभर मविआच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा जरी डॉ. जयश्री थोरात व काँग्रेस कार्यकर्ते सांभाळत असलेतरी उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अनेक शिवसैनिक प्रचारात सक्रिय झाला आहे. थोरात यांच्यासाठी पंजाचा प्रचार करत शहरासह ग्रामीण भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत थोरातांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहे.
आ. थोरात हे केवळ काँग्रेसचे नेते नसून महाविकास आघाडीचे समन्वयक आहे. नवव्यांदा ते विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या उमेदवारीला पसंती मिळत आहे. त्यांच्यावर मविआची मोठी जबाबदारी असल्याने त्यांच्या विजयाची जबाबदारी आता येथील ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी घेतली आहे.
शहराच्या विविध भागात शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक व माजी शहरप्रमुख अमर कतारी व दिपक साळुंके, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, मोहसीन शेख, इम्तियाज शेखे, राजू सातपुते, अमोल डुकरे, गोवींद नागरे, सचिन साळवे, मच्छिंद्र फुलमाळी, अशा केदारी, रेणूका शिंदे, राजश्री वाकचौरे, संगिता गायकवाड, फैजल सय्यद यांच्यासह शिवसैनिक प्रचार फेर्या काढून मतदारांना थोरातांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच अमर कतारी हे विविध माध्यमावर देखील थोरातासाठी खिंड लढवत असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कतारी हे मविआसाठी जोरदार खिंड लढवत असल्याने ते चर्चेचा विषय ठरल्या आहे. महाविकास आघाडीचा धर्म या फेर्यांमधून पाळला जात असल्याचा संदेश मतदारांमध्ये पोहोचविण्यात कतारी यशस्वी झाले आहे.
तसेच काँग्रेसच्या लाभार्थी पुढारी व पदाधिकार्यांपेक्षा जोरदार प्रचार कतारी करतांना दिसत आहे. तर ग्रामीण भागाची जबाबदारी ठाकरे सेनेचे सैनिक ड. दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, संजय फड, अशोक सातपुते, जालिंदर लहामगे, अमोल कवडे, घनश्याम जेधे, समीर ओझा, निलेश गुंजाळ, भाऊसाहेब हासे, भैय्या तांबोळी महिला आघाडी यांच्यासह शिवसैनिकांनी घेतली असून तालुक्यातील वाड्या वस्त्यावर जाऊन, भेटी – गाठी, बैठका, सभा घेऊन महाविकास आघाडी व पर्यायाने आ. बाळासाहेब थोरात यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातून मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे आता थोरात उमेदवार असल्याने शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक थोरातांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.
काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक आ. बाळासाहेब थोरात यांच्या विजयासाठी मेहनत घेत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने एक वेगळेच चित्र तालुक्यात दिसत असून आ. थोरातांकडून देखील या शिवसैनिकांचे अभिनंदन होत आहे. भविष्यकाळात ही महाआघाडी कायम राहिल्यास त्याचा फायदा ठाकरेंच्या सेनेला देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान अजूनही अनेक शिवसैनिक प्रचारापासून लांब असून काही जण मागच्या दाराने विरोधी उमेदवाराचे काम करताना देखील दिवस आहे. सध्या तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कुठे दिसत नसले तरी ठाकरेंचे शिवसैनिक मात्र थोरातांचा जोरदार प्रचार करीत असल्याचे अनोखी चित्र तालुक्यात दिसत आहे.