सुभाष सांगळे यांची जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड

माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सांगळे यांना नियुक्तीपत्र देत सत्कार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अहमदनगर उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यानंतर राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सांगळे यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करण्यात आला.
सुभाष सांगळे यांनी आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणाला सुरूवात केली.

सुरुवातीला संगमनेर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष, नंतर उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव काम केले. पक्षासाठी युवकांचे संघटन, विचार मेळावे, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सत्ता असताना आणि नसताना देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने जिल्हा काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी, पक्षात तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी हिरिरीने प्रयत्न केले. त्यांच्या पक्षकार्याची दखल घेऊन पक्षाने वेळोवेळी त्यांच्यावर जबाबदारी टाकली. आणि आज पक्षाने जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून त्यांची केली आहे. सुभाष सांगळे यांचे वडील लक्ष्मण सांगळे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निमोण, तळेगाव परिसरात सामाजिक राजकीय धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन काम केले. त्यांचे कार्य आज सुभाष सांगळे यांच्या रुपाने दुसरी पिढी पुढे नेत आहे.

तालुक्यातील देवकौठे येथील रहिवासी असलेले आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुभाष सांगळे यांच्या या निवडीनंतर आ. बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जयश्री थोरात, बाबा ओहळ, नवनाथ अरगडे, निखिल पापडेजा, माजी सरपंच बाळासाहेब कांदळकर, हौशीराम सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगमी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सुभाष सांगळे यांची झालेली निवड महत्वाची ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख