हनुमान जयंती परंपरेचा सोहळा उत्साहात

0
3

महिलांनी ओढला मारुतीरायाचा रथ

संगमनेर – शहरात सालाबादप्रमाणे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या मारूतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना असतो त्याप्रमाणे हा रथ महिलांनी ओढला. हा रथ फुलांनी सजवून त्यावर शहर पोलीस यांच्या वतीने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांचे हस्ते ध्वज लावण्यात आला. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, सौ. निलमताई खताळ, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, नगरसेविका यांच्यासह अनेक मान्यवर व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेनुसार रथाची मिरवणूक चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मीचौक, लालबाहदूर शास्त्री चौक, नगरपालीका, चावडी चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरूचौक व पुन्हा चंद्रशेखर चौक अशी मोठ्या उत्साहात पार पडली.

पवनपुत्र हनुमान आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करत उपस्थित आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी एकत्र येत हनुमानाचा रथ ओढत महिलांनी हनुमान रथ ओढण्याची परंपरा आजही कायम जपली आहे
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती निमित्त सकाळी आठ वाजता संगमनेर शहर पोलीस स्टेशनपासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी वाजत गाजत भगवा ध्वज घेऊन चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिराजवळ आले आणि सजवलेल्या रथाला विधिवत भगवा ध्वज लावण्यात आला.

यावेळी आमदार अमोल खताळ व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी हनुमान रथाचा दोर हातात धरून चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला त्यानंतर ही मिरवणूक चंद्रशेखर चौकातून रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगर पालिका,चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरूचौक मार्गे पुन्हा चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिरात या मिरवणुकीची सांगता झाली.

ही मिरवणूक शांततेत पार पाडण्या साठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागुल, चंद्रशेखर हिंदू मंडळाचे अध्यक्ष शुभम लाहामगे, महिला शक्ती सदस्य देवयानी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले


हनुमान राठोत्सव मिरवणूक मार्गावर शिवसेना माजी शहरप्रमुख स्व.आप्पा साहेब केसेकर यांच्या परिवाराकडून नाश्त्याची सोमनाथ गवंडी व सुरेंद्र गवंडी परिवाराकडून राजगिरा लाडू, गजानन एजन्सीकडून बिसलरी थंड पाण्याची बॉटल तर कल्पेश मर्दा, वाल्मीक तरुण मित्र मंडळ व आकाश जेथे मित्र मंडळ यांच्या वतीने थंडगार शरबताचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here