मला संधी दिल्यास त्या संधीचे सोने करणार – रविंद्र म्हस्के

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर-
प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांकडे पाहिल्यास एक नाव सतत समोर येते. रविंद्र देवराम म्हस्के. कोणतेही पद नसताना, केवळ नागरिक म्हणून प्रभागातील समस्यांकडे बघण्याचा आणि त्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा उल्लेखनीय आहे. वॉर्डमधील सर्वसाधारण गरजांपासून ते सौंदर्यीकरणापर्यंत अनेक कामे त्यांनी निस्वार्थ भावनेने करून दाखवली आहेत.

मी प्रभाग क्र 5 मध्ये पद नसतानाही अनेक कामे पार पाडत आहे. माझी प्रभागातील सर्व बांधवांना विनंती आहे की मी नगरसेवक म्हणून निवडणून आल्यानंतर प्रभाग 5 ला संगमनेरातील सर्वांत सुंदर आणि जास्तीत जास्त निधी मिळवून देणारा प्रभाग करेल असे रविंद्र म्हस्के यांनी सांगितले.
प्रभागातील चौकाचे सुशोभीकरण हे त्यापैकी सर्वात मोठे उदाहरण. डिव्हायडरमध्ये लावलेली आकर्षक झाडे, त्यासोबत केलेली सुंदर लायटिंग या सगळ्यामुळे हा चौक आज संगमनेर शहरातील एक वेगळा ओळख निर्माण करणारा ठरला आहे. या कामाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तसेच आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी निघालेली भव्य मिरवणूक आणि नागरिकांच्या चेहर्यावरील आनंद हेच या कामाच्या यशाचे खरे मोजमाप होते.


याचबरोबर, जय जवान चौकात करण्यात आलेली आकर्षक कमान वॉर्डमध्ये प्रवेश करताना एक वेगळाच दर्जा जाणवून देते. आपण एका व्यवस्थित आणि सुबक वॉर्डमध्ये प्रवेश करतो आहोत अशी भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ही कमान उभारण्यात आली असून ती आज प्रभागाची अभिमानाची खूण बनली आहे. प्रभागातील नागरिकांच्या श्रद्धेचा आदर राखत, स्वत:च्या मालकीच्या जागेत माऊलाई मातेचे सुंदर मंदिर बांधण्याची पुढाकार रविंद्र म्हस्के यांनी घेतला. हे मंदिर आज वॉर्डमधील अनेक कुटुंबांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. नुकत्याच झालेल्या मिरवणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णाताई खताळ आणि आमदार अमोलभाऊ खताळ यांची पत्नी नीलम खताळ यांनी भक्तिभावाने पूजा केली-यातून या स्थानिक उपक्रमांची व्यापक स्वीकारार्हता दिसून येते.
महिला, भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आयोजित केलेली आरोग्य तपासणी शिबिरे प्रभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. उइउ, रक्त तपासणी आणि विविध आजारांच्या निदानासाठी घेतलेल्या शिबिरांत नागरिकांना मोफत सेवा मिळाल्या आणि त्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला.


याशिवाय, रक्तदान शिबिरांतून शेकडो रक्त पिशव्या जमा करून त्यांनी संगमनेरमध्ये एक आदर्श निर्माण केला. कोविडच्या कठीण काळातही मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आजही नागरिकांच्या लक्षात आहे.
प्राणी संरक्षणाबद्दलची जाण आणि श्रद्धा लक्षात घेऊन गोशाळेसाठी चारा पुरवण्याची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली आहे. गोशाळेत जाऊन वैयक्तिकरित्या चारा वाटप करणे-हा त्यांचा साधा पण मनाला भिडणारा उपक्रम. निव्वळ मोठी कामेच नव्हे तर दैनंदिन अडचणी सोडवण्याबाबतही त्यांचा तितकाच कळवळा आहे. वॉर्डमधील स्ट्रीट लाईट बदलणे, झाडांची छाटणी, रिकाम्या प्लॉटमधील गवत काढणे आणि औषध फवारणी या छोट्या पण आवश्यक कामांसाठी त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याशी सतत पाठपुरावा केला आणि नागरिकांना त्वरित सुविधा मिळवून दिल्या.

आज रविंद्र देवराम म्हस्के प्रभाग क्र. 5 मधून शिवसेना (धनुष्यबाण) या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मागील कामांकडे पाहिल्यास, कोणत्याही पदाविना केलेली सेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात ठळक पैलू दिसतो. वॉर्डातील नागरी गरजा, सौंदर्यीकरण, श्रद्धास्थानांचे संवर्धन, आरोग्य उपक्रम आणि सामाजिक काम या सर्व क्षेत्रांत त्यांनी दाखवलेली सातत्यपूर्ण बांधिलकी नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढवते. पदाची गरज न पडता काम करणारा एक माणूस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र म्हस्के यांचे हे वेगळेपणच चर्चेचा विषय ठरत आहे.

















