मुख्याधिकाऱ्यांना झालेल्या आरेरावीचा कर्मचाऱ्यांकडून निषेध

दोषींवर कार्यवाही न झाल्यास कामकाज बंद ठेऊन करणार निषेध व्यक्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -शहरातील लखमीपुरा येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांना अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना गुरुवारी घडली होती. यामुळे शुक्रवारी सकाळी नगरपरिषदेमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. धमकी देणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असून, याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.


दिलेल्या निवेदनात म्हटले की, फैज रहेमतुल्ला शेख (रा. लखमीपुरा) यांचा व इतर 24 रहिवाशांनी नगरपरिषद हद्दीत लखमीपुरा कब्रस्थानच्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याबाबत अतिक्रमण विभागाचे पथक संबंधित अधिकारी व मुख्याधिकारी स्वतः बांधकामस्थळी जाऊन बांधकाम काढण्याची कार्यवाही सुरू केली असताना रफिक एजाजुद्दीन शेख व सारिक एजाज शेख यांना सामान काढून घेण्याची सूचना देऊनही अतिक्रमण न काढता मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर कागदांचा गठ्ठा भिरकावला, धावून जाऊन शिवीगाळ केली. या घटनेचा नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच संबंधित दोषींवर कार्यवाही न झाल्यास नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेऊन त्याचा निषेध व्यक्त करणार आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख