गाढवाची प्रतिकात्मक दाढी करून आंदोलन

0
1082

गावाबाहेरील नागरीकांचा निमोणमध्ये
समावेश करण्यासाठी सरपंचाचे आंदोलन

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर –

संगमनेर तालुक्यातील निमोण गावच्या परिसरात वसलेल्या नागरीकांना निमोण गावात समाविष्ट करण्याची मागणी वारंवार निमोण ग्रामपंचायत व ग्रामस्थ करीत आहेत. महसूल मंत्री यांनी याबाबत सूचना देऊनही जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने अखेर निमोण ग्रामपंचायत सरपंच संदिप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची प्रतिकात्मक दाढी करून आंदोलन करण्यात आले. गावाबाहेर इतरत्र असलेल्या सुमारे आकराशे नागरीकांचा निमोणमध्ये समावेश कारावा अशी मागणी मागील वर्षाभरापासून निमोण ग्रामपंचायत करत आहे. मात्र महसूल प्रशासन याकडे डोळे झाक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here