
डॉ. अमेय देशमुख यांच्या कौशल्याने यश

संगमनेर (प्रतिनिधी) – 15 वर्षांची तरुणी सतत खोकला येण्याने आणि टोचल्यासारखे वाटल्याने डॉ. अमेय देशमुख यांच्या देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली.
छातीचा एक्स-रे केल्यानंतर डाव्या बाजूच्या श्वसन नलिकेमध्ये काही धातूची गोष्ट असल्याचा संशय आला.
यानंतर त्यांनी श्वसन मार्गाची दुर्बिणीद्वारे (ब्रॉंकोस्कोपी) तपासणी करण्याचे ठरविले. ब्रॉंकोस्कोपी केल्यानंतर डाव्या बाजूच्या श्वसन नलिकेमध्ये स्कार्फला लावण्याची 4 सेंटीमीटर लांबीची टोकदार सुई आढळून आली.
त्यानंतर डॉ. अमेय देशमुख यांनी आपल्या कौशल्याने आणि विशिष्ट तंत्राचा वापर करून ही टोकदार सुई श्वसन मार्गातून बाहेर काढली. टोकदार सुई श्वसन नलिकेतून बाहेर आल्याने रुग्णाने आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. डॉ. अमेय देशमुख यांच्या या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
छातीरोग तज्ञ असलेल्या डॉ. अमेय देशमुख यांनी कोव्हिड काळामध्ये संपूर्ण संगमनेर तालुक्यात आपली सेवा दिली. दिल्ली येथून उच्च शिक्षण घेतलेले अमेय देशमुख यांच्या देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वच आजारांवर उपचार केले जातात.