संगमनेरमध्ये फुलझडी मेळ्याची धूम

0
1804

मालपाणी लॉन्स येथे फूड, फन, फॅशन स्टाॅल भेटीसाठी उत्सुकता

संगमनेर (प्रतिनिधी)
स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रिद समोर ठेऊन शहरात कार्यरत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर व रोटरी क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व तालुक्यात फुलझडी या दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फुलझडीचे हे पहिलेच वर्ष असून सणासुदीच्या दिवसांमध्ये गरजेच्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, बाहेरगावातील तसेच शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना एकाच छताखाली व्यासपीठ मिळावे या हेतूने फुलझडी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनिता गाडे यांनी दिली
फुलझडी दिवाळी मेळ्यात सुमारे 110 स्टॉल असून यामध्ये दिवाळी सणाशी संबंधीत सर्व व्यावसायिकांचा समावेश व्हावा यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले आहेत. लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व पुरुषांचे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, लहान मुलांचे आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, पॅकिंग फुड, रोजच्या गरजेच्या वस्तु, फर्निचर मॉल, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळी सणाचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू, दिवाळी लाईट, दिवे, आर्ट, क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू आणि अजुनही बरेच स्टॉल असणार आहे. या मेळ्यासाठी मिताली ब्रायडल वर्ल्ड व एक्स्पर्ट डेंटल क्लिनिक हे सहप्रायोजक असणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद हासे यांनी दिली.


शनिवार दि. 28 ऑक्टोबर पासून ते सोमवार दि. 30 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत मालपाणी लॉन्स येथे हा दिवाळी मेळा भरणार आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, महेश ढोले, डॉ. एकता वाबळे, सौ. प्रतिमा गाडे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी मधुसुदन करवा, खजिनदार अमित पवार, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शिल्पा नावंदर, सेक्रेटरी नेहा सराफ, प्रकल्प समितीतील दिपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डाॅ. किशोर पोखरकर, सीए संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रविंद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनिल घुले, मोहित मंडिलक, रमेश पावसे, विकास लावरे, संतोष आहेर, विश्वनाथ मालाणी, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, पिंकी शाह, राखी करवा, सिमा अत्रे, डाॅ. शामा पाटील, सुनिता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब सदस्य, इनरव्हील क्लब सदस्य काम पाहत आहेत. प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी शिल्पा 8055411222, अमित 9850133006 यांना संपर्क करावा, तसेच संगमनेरकरांनी या दिवाळी मेळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here