नवीन संचालक मंडळ गणेशला पुन्हा वैभव प्राप्त करून देईल – आमदार थोरात



थोरात कारखान्यावर विवेक कोल्हे यांचेसह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – गणेश कारखाना हा राहता तालुक्याची कामधेनू असून मागील आठ वर्षांपासून या कारखान्याची प्रगती थांबली होती. ऊस उत्पादकांचे मोठे हाल होत होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संगमनेर व संजीवनी प्रमाणे हा कारखाना चालवून नवीन संचालक मंडळ हे गणेश कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल असा विश्वास  विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर गणेश कारखान्याच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते विवेक भैय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ , संतोष हासे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,डॉ एकनाथ गोंदकर , गणेश चे संचालक ॲड .नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर डांगे, संपत हिंगे, महेंद्र गोरडे ,बाळासाहेब शेळके, नानासाहेब नळे ,सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके अनिल गाढवे संपत चौधरी ,अनिल टिळेकर, मधुकर सातव, आलेश कापसे, सुधाकर जाधव, शोभाताई गोंदकर, कमलताई धनवटे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, गणेश परिसरातील सभासदांनी निवडणुकीत गणेश परिवर्तन पॅनलवर मोठा विश्वास दाखवला आहे. नवीन निवडलेले संचालक मंडळ हे जुन्या नव्यांचा मेळ असून या कार्यक्षेत्रातील समस्यांची जाणीव असणारे आहे.कारखान्याच्या उत्तम व्यवस्थापनाबरोबर सभासदांना चांगला भाव देणे व कारखान्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देणे यासाठी सर्व संचालकांनी काम करावेराहता तालुका हा पूर्वी वैभवशाली व समृद्ध तालुका होता. मात्र अनेक दिवसांपासून या तालुक्याची प्रगती थांबलेली आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गणेश परिसरातील ऊस उत्पादक नेहमी संगमनेर व संजीवनी कडे ऊस द्यावा यासाठी आग्रही असायचे. आता या उसाचे गणेश कारखान्यातच गाळप केले जाणार असून हा कारखाना पुन्हा आपला सुवर्णकाळ पाहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलातर युवा नेते विवेक भैय्या कोल्हे म्हणाले की ,आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील सहकारातील अत्यंत आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या विचारांवर गणेश कारखाना सक्षमपणे चालवला जाईल असा विश्वास व्यक्त करताना नवीन संचालक मंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्यायावेळी उपस्थित संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले

विवेक भैय्या कोल्हे यांचा सत्कार

अहमदनगर जिल्ह्यातील शांत, संयमी असलेले युवा नेते विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावताना आमदार थोरात यांच्या सोबत श्री गणेश परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करत मोठा विजय मिळवून दिला याबद्दल मा. महसूल मंत्री, राज्याचे नेते आमदार थोरात यांनी विवेक भैय्या कोल्हे यांचा सत्कार केला

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख