बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको 2022- 23 च्या ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्काराने केले सन्मानित
२०२२ मध्येही अमृतवाहिनी बँकेने मिळवला हाेता बँकाे पुरस्कार
संगमनेर (प्रतिनिधी) काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा मा. महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दमण येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला
देल्टीन रिसॉर्ट दमन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर पी के अरोरा यांच्या हस्ते पुरस्कार अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, संचालक राजेंद्र काजळे, श्रीकांत गिरी तसेच बँकेचे सीईओ श्री अंबादास वाणी यांनी स्वीकारला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत. 500 दूध उत्पादकांना बिगर तारण दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार व ऊस वाहतुकीसाठी 30 कोटी रुपयांचे कर्ज बँकेने प्रथमच उपलब्ध करून दिले आहे.
याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नव्याने आश्वी बु. व संगमनेर खुर्द येथील शेतकी संघ पेट्रोल पंपाजवळ बँकेची शाखा सुरू केली जाणार आहे. काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम करण्यात आले असून नव्याने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते मुख्य शाखेत अत्याधुनिक लॉकर ची सुविधा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे.
सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला आहे . ग्रामीण भागात असूनही पाचशे कोटींची ठेव असलेल्या या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन 2022- 23 चा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित केले आहे.यापूर्वीही अमृतवाहीणी बँकेला 2022 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
या पुरस्कार नंतर सुधाकर जोशी म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांची वाटचाल सुरू असून या संस्था राज्यातील सहकारासाठी आदर्शवत ठरले आहेत.हा पुरस्कार सांघिक कामाचा असून यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, अधिकारी, कर्मचारी यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात,रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ,शंकर पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, राजेश मालपाणी आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.