अनैतिक संबंधातून खून; पोलिसांकडून महिलेसह तिघे गजाआड

0
2058

लळईच्या घाटात सापडला हाेता अर्धवट जळालेला मृतदेह

घारगांव
संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस स्टेशन हद्दीत जांभुळवाडी शिवार, लळईचा घाट येथे हत्या करुन मृतदेह पेटवुन दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या अनोळखी प्रेताचा व आरोपीचा घारगांव पोलीसांनी अवघ्या दोन दिवसाच्या आत प्रेताची ओळख पटवुन तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनांक 16/12/2023 रोजी दुपारी 01:00 वा. पुर्वी जांभुळवाडी शिवारात संगमनेर ते साकुर जाणारे रोडचे पुर्व बाजुस लळईचे घाटात वनविभागाच्या जमीनीमध्ये बाळासाहेब भागवत विघे यांचे जमीनी शेजारी बांधालगत कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 यास जीवे ठार करुन त्याची ओळख पटु नये या करीता त्याचे अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकुन त्यास पेटवुन दिलेले आहे. या माहिती व फिर्यादीवरून घारगांव पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 562/2023 भा.द.वि. कलम 302, 201 प्रमाणे दि. 16/12/2023 रोजी दाखल करण्यात आला होता.


अनोळखी मृतदेहाची गोपनीय माहितीगारामार्फत माहिती प्राप्त करुन सदरचा मृतदेह गोरख उर्फ गोरक्ष दशरत बर्डे, वय 53 मुळ रा. लोहारे ता. संगमनेर हल्ली रा. पेमदरा, आणे, ता. जुन्नर जि. पुणे, असे असल्याचे निष्पण झाले. त्यावर त्याची पत्नी अलका गोरक्ष बर्डे, वय 42 वर्षे रा. लोहारे ता. संगमनेर जि. अहमदनगर यांचा शोध घेवुन मिळालेल्या प्रथमिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. पोलीस तपास करत असताना आरोपी दिनेश शिवाजी पवार, वय 32 वर्षे रा. वडगाव, केंदळी ता. जुन्नर जि. पुणे, विलास लक्ष्मण पवार, वय 40 वर्षे रा. पेमदरा, आणे, ता. जुन्नर जि. पुणे, विमल विलास पवार, वय 37 वर्षे, रा. पेमदरा, आणे, ता. जुन्नर जि. पुणे, यांना ताब्यात घेवुन पोलीसांनी आपल्या पध्दतीने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.


आरोपीताकडुन माहिती घेतली असता गोरख उर्फ गोरक्ष बर्डे याचे दिनेश पवार याची सासु शोभा काळे हिचे सोबत अनैतीक संबंध असुन तो तीच्याकडेच राहत होता. तसेच तो दिनेश पवार याची पत्नीकडे वाटई वासनेने बघत होता. तीच्याकडे शारिरीक सुखाची मागणी देखील करत होता. तसेच आरोपी विमल पवार हिचे सोबत देखील मयताने अनैतिक संबंध होते. त्यावरुन त्यांचे अनेकदा वाद झाले होते. दि. 15/12/2023 रोजी एका लग्नामध्ये असताना विमल पवार हिस दारु पाजली होती. त्यानंतर मयत गोरख उर्फ गोरक्ष बर्डे याने विमल पवार हिचे सोबत शेतात शारिरीक संबंध करत असताना विमलचा पती विलास पवार व दिनेश पवार याने त्यांना पाहिल्याने याचा राग त्यांना आणावर होवुन त्यांनी मयतास दारु पाजुन मारहाण केली. आणि तीघांनी मिळुन मयत गोरख उर्फ गोरक्ष बर्डे यास मोटार सायकलवरुन जांभुळवाडी शिवरातील लळईच्या घाटात वनविभागात घेवुन जावुन सदर ठिकाणी स्क्रू डायव्हरने त्याचे गळ्यावर वार केले. तसेच बेल्टने त्याचा गळा आवळुन त्यास जीवे ठार मारले. गोरख उर्फ गोरक्ष बर्डे याचे मृत्यु झाल्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढुन त्याच्या चेहरा दगडाने ठेचून पेट्रोल अंगावर ओतुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेटवुन देत त्या ठिकाणावरुन पळ काढला.
दरम्यान आरोपींना थंड डोक्याने एक खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आपले कृत्य लपविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांच्या नजरेतून हे गुन्हेगार सुटले नाही. घारगाव पोलिसांनी केवळ अनोळखी इसमाची ओळखच पटविली नाही तर एक दोन नव्हे तिनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अनैतिक संबंधातून एक गेला, तीन आत गेले.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, यांचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, घारगांव पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थागुशा, पो.उप.निरी सोपान गोरे, स्थागुशा पो.उप.निरी उमेश व्ही पतंगे, घारगांव पोलीस स्टेशन, सफौ सुरेश टकले, पोहेकॉ गणेश लोंढे, पोना दत्तु चौधरी, पोका /सुभाष बोडखे, पोकॉ/ प्रमोद गाडेकर, पोकॉ/ प्रमोद चव्हाण, पोकॉ महादेव हांडे, पोकॉ रंजित जाधव, पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, पोकॉ सागर ससाणे, चापोहेकॉ कुसळकर, पोना / फुरकान शेख, स्थागुशा, पोकॉ प्रमोद जाधव, व पोकॉ आकाश बहिरट, पोना सचिन धनाड ने. सायबर सेल अप. पो. अधि. कार्यालय, श्रीरामपुर, यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घारगांव पोलीस स्टेशन करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here