संगमनेर महाविद्यालयासमोर बिबट्या

बिबट्या

विद्यार्थी आणि प्रवाश्यांचा जीव धोक्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला असताना आता बिबटे थेट संगमनेर महाविद्यालय व नाशिक पुणे महामार्गावर फिरत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. तर या महामार्गावरून प्रवास करणारे, पहाटे फिरायला जाणार्‍या नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची गरज निर्माण झाली.प्रचंड जंगलतोड व सातत्याने होणारे नागरिकीकरण यामुळे जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करू लागले आहे.त्यामुळे मानवी जीव धोक्यात आले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी, गुंजाळवाडी, घुलेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. आता हे बिबट्याचे थेट नाशिक पुणे महामार्गावर फिरताना दिसून येत आहे.

दरम्यान आज पहाटे 1.41 च्या दरम्यान संगमनेर महाविद्यालयाच्या भिंतीजवळ एक बिबट्या बसलेला एका कार चालकाला आढळून आला. त्यामुळे त्या कार चालकाने आपली गाडी थांबवून या बिबट्याचे चित्रीकरण केले. यावेळी सदर बिबट्या महाविद्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. परंतु आत घुसता न आल्याने तो समोर असणार्‍या वसाहतीच्या दिशेने पळून गेला. ही शुटींग (चित्रीकरण) आज बुधवारी सकाळी सोशल माध्यमातून सर्वत्र पसरल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. संगमनेर महाविद्यालयाचा अनेक एकरचा परिसर आहे. अनेक इमारती व ठिकठिकाणी वनराईने सजलेला हा परिसर आहे. त्यामुळे बिबट्यांना मोठे लपन आहे. या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीक सायंकाळी व सकाळी फिरण्यासाठी जातात. एखादा बिबट्या या परिसरात कुठे लपून बसला व त्याने एखाद्या विद्यार्थ्यावर हल्ला केला तर मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच समोर असणार्‍या महामार्गावर असंख्य वाहनांची व नागरीकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा असलेला वावर हा धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी याच कॉलेजच्या मागील बाजूस सकाळच्यावेळी रस्त्यावर बिबट्या अढळून आला होता. यावेळी एक महिला मॉर्निंग वॉकला जात होती. या घटनेतून सदर महिला थोडक्यात बचावली होती. वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन सदर बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नागरीक करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख