संगमनेरच्या महावितरणविरोधात प्रचंड आक्रोश

0
1279

सर्व्हिस आणि मेंटेनन्सची बोंब

सेवेत चुकल्यास नागरिक “खळखट्याक” च्या तयारीत

संगमनेर एमआयडीसीमधील उद्योजक वीजेच्या त्रासाने मेटाकूटीला

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये वीजेच्या त्रासाने उद्योजक मेटाकुटीला आले असून दररोज 4-5 वेळा ट्रिपींग होते. या ट्रिपींगमुळे अनेकांच्या मोटर्स, डिव्हायसेस, ड्राईव्ज, केबल्स याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. एमआयडीसीमध्ये सुध्दा डीपीवर प्रमाणापेक्षा जास्त लोड असून नवीन लोडसुध्दा त्याच डीपीमधून देण्यात येत आहेत. निमोण फिडरवर पक्षी बसला तरी ट्रिपींग होते आणि 132 के.व्ही. वर काम निघाले तरी ट्रिपींग होते. मेंटेनन्स किंवा चेकींग करताना काहीही न सांगता कनेक्शन बंद केले जाते. या सर्व कारणांमुळे उद्योजकसुध्दा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दोनदा समक्ष भेटून उद्योजकांनी आपले प्रश्न अधिकार्‍यांना मांडले. तरी सुध्दा हा प्रश्न सुटला नसल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांनी दिला आहे.

नेट मीटरींग आणि अन्य कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा नागिरकांचा आरोप

युवावार्ता (विशेष प्रतिनिधी)
संगमनेरमधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ‘महावितरण’ विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असून सेवेच्या नावाने नुसती बोंब आहे. ऐन उन्हाळ्यात वीज जाण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक उष्णतेने हैराण आहेत. प्रत्येक शनिवारी लोडशेडींग हा महावितरणचा जन्मसिध्द हक्क असल्यासारखे वागते आहे. प्रत्येक शनिवारी ही कंपनी असा कोणता मेंटेनन्स करत आहे? हा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.


प्रत्येक डीपीवर वीजेचा लोड काही लोड दिलेला असतो. या लोडव्यतिरिक्त अनेक नवीन कनेक्शन या डीपीवर दिले जातात. डीपीवर वीजेचा असणारा ताण वाढला तर वीज खंडीत होणारच. व्यावसायिक नव्याने उद्योग व्यवसाय टाकत आहेत. या दुकानांमधील आर, वाय, बी चा लोडसुध्दा समानतेने वितरीत केलेला नसतो. यासंदर्भात महावितरणचे कर्मचारी कुठलीही सेवा देत नाही. त्यातील बारकावे सुध्दा सुचवत नाहीत.
कोणत्याही कारणाने लोड शेडींग होणार असेल तर त्याचा मेसेज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावरती जायला हवा. असे होत नाही. साधा पाऊस सुरू झाला तरी लोडशेडींग सुरू होते. 21 व्या शतकात अजून सुध्दा वीज वितरण कंपनीला या गोष्टींना का सामोरे जावे लागते हा मोठा प्रश्न आहे.
अचानक होणार्‍या लोडशेडींगमुळे घरातील, दुकानातील इलेक्ट्रीकल अ‍ॅप्लायन्सेस खराब होत असून लाखोच्या होणार्‍या नुकसानीला महावितरण कर्मचारी आणि अधिकारीच जबाबदार आहेत. यापुढे सेवेत दिरंगाई झाली तर संगमनेरच्या नागरिकांनी ‘खळखट्याक’चा अवलंब करण्याचे ठरविले आहे.
महिन्याच्या शेवटी येणारे वीजेचे बील हे मेलवर पाठविले जाते मात्र हार्ड कॉपी कधीही वेळेवर मिळत नाही. हार्ड कॉपी जर वेळेत आली नाही तर बील भरायचे कसे? बीलावर देय रक्कम या तारखेच्या आतमध्ये भरली तर ही रक्कम आणि या तारखेच्या नंतर भरल्यानंतर दंड आकारला जातो. महावितरणचे कर्मचारी याबाबत चुकत असतील तर ग्राहकांना त्याचा भुर्दंड का?
नेट मीटरींग जोडण्यासाठी भ्रष्टाचाराबाबत जनता सजग असून जनता संयमी आहे. संयमाचा हा बांध जर फुटला तर अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरिकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here