आमिषाला बळी पडल्याने त्यांनी शिवसेनेला सोडले – सूर्यकांत शिंदे

गेलेल्यांची चिंता करू नका, युवापिढी शिवसेनेसोबत


संगमनेर
ओरिजनल शिवसेना सोडून गेलेले केवळ सत्तेच्या लालसेपोटी आणि आमिषाला बळी पडलेले होते. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ताकद संगमनेर तालुक्यात असून युवापिढी शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे गेलेल्यांची चिंता करू नका, संघटन वाढवा असा सल्ला शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना दिला.
शिवसेनेच्या संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिंदे शनिवारी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसेना, युवासेना, दिव्यांग सहाय्य सेना आदींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, पठारभाग तालुका प्रमुख संजय फड, ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब गुंजाळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेनेचे शहरप्रमुख गोविंद नागरे, दिव्यांग सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, बाजार समितीचे संचालक विजय सातपुते, ग्राहक कक्षाचे उपजिल्हा संघटक प्रवीण कुलट, माजी नगरसेवक सुनील दिवेकर, बाळासाहेब घोडके, सुर्दशन इटप, विकास डमाळे, रंगनाथ फटांगरे, पप्पू कानकाटे, शोएब शेख, राजू सातपुते, वैभव अभंग, संकेत खुळे, निलेश गुंजाळ, सचिन पावबाके, सोहेल पठाण, विलास भोंडवे, सलमान शेख, अक्षय गाडे, प्रकाश क्षत्रिय, शरद पावबाके आदी यावेळी उपस्थित होते.


यावेळी संपर्कप्रमुख शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी शिवसैनिक कायमच जोडले गेले आहेत. ठाकरे यांच्या पेक्षा कुणीही मोठे नाही. ग्रामीण भागातील शिवसैनिकांची ओरिजनल शिवसेनेसोबत नाळ जोडलेली आहे. शिवसेना सोडून गेलेले जर आपल्या साहेबांच्या विचारांची प्रामाणिक असते तर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केलेले काम याची देशात दखल घेतली गेली. आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रातील युवा शिवसेनेशी जोडला जातो आहे. पक्षात येणाऱ्या युवकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे बळ मिळते आहे. जुने-नवे शिवसैनिक एकत्र आल्याने निश्चित आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राज्यात शिवसेनेची ताकद वाढलेली दिसेल. असेही शिंदे म्हणाले. गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे यांनी प्रास्ताविक केले. विकास डमाळे यांनी सूत्रसंचलन केले. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी आभार मानले.


पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम करत असताना माजीमंत्री बबनराव घोलप, संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून बबनराव घोलप यांना पक्षाने उमेदवारी द्यावी. अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख