राजापूरमध्ये बिबट्याच्याहल्यात शेतकरी जखमी

0
898

शेताच्या बांदावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेत केला हल्ला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यात बिबट्यांंचे नागरिकांवर होणारे हल्ले चिंताजनक बनले आहे. बिबट्यांच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शेतकर्‍यांना शेेती करणे ही अवघड झाले आहे. तालुक्यातील राजापूर येथे चिखली रोड वरील एका शेतकर्‍याच्या शेतात वाटेकरु म्हणून काम करणार्‍या शेतकर्‍यावर बिबट्याने जोरदार हल्ला केल्याने हा शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी 06 वाजता घडली. राजापुर येथील चिखली रस्त्यावर भाऊसाहेब नामदेव हासे यांचे फ्लॉवरचे शेत अकोले तालुक्यातील उडदावणे येथील रोहिदास लिटे हा शेतकरी वाट्याने करत आहे.

आज मंगळवारी पहाटे फ्लॉवरच्या शेतात रोहिदास हे काम करत असताना शेताच्या बांदावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेत हल्ला केला. यावेळी दोघांमध्ये चांगली झटापट झाली. या झटापटीत रोहिदास यांच्या हाताला, पायाला, डोक्याला बिबट्याने मारलेल्या पंज्यामूळे चांगलीच जखम झाली. या शेतकर्‍याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गोर्डे घटनास्थळी हजर झाले. राजापुर परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने पिंजरा बसवावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here