फिनिपिन्समध्ये गाडला संगमनेरचा झेंडा; ट्रायथलॉनमध्ये दाखविले कौशल्य
डॉ. अमोद शिवाजी कर्पे यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन
९५ किलो वजन असलेले डॉ. अमोद कर्पे यांनी दररोज २ तास ट्रेनिंग केली आणि आपले वजन ५५ किलोपर्यंत कमी केले. म्हणजे एकूण ४० किलो वजन त्यांनी घटविले. १२ किमी धावणे, ६० किमी सायकलिंग आणि ५ किमी स्विमींग असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे तरूण पिढीला नवा आदर्श मिळाला आहे.
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी) -11 ऑगष्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा दावो फिलिपिन्स येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संगमनेर येथून पसायदान हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोद कर्पे, आपला बाजार उद्योग समूहाचे संचालक अमर नाईकवाडी आणि राजपाल उद्योग समूहाचे संचालक करण राजपाल यांनी सहभाग घेतला होता.फिलिपिन्स हा दक्षिण आशियामधील एक द्विपसमूह देश असून चारही बाजूंन समुद्र, हिरवीगार जंगले आणि उंच पर्वतरांग आहेत. दावो सिटी कोस्टल रोडवरून ही स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 1.9 किमी पोहणे, मॅकार्थर हायवेवरती 90 किमी सायकलिंग करणे आणि कोस्टल रोडवरती 21.1 किमी धावणे असे कडवे आव्हान या स्पर्धकांपुढे होते. करण राजपाल यांनी 30-34 वर्षे वयोगटात सहभाग घेतला होता तर डॉ. अमोद कर्पे आणि अमर नाईकवाडी यांनी 40-44 वर्षे वयोगटात सहभाग घेतला होता.
अतिशय कठीण असलेल्या या स्पर्धेची तयारी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. दररोज धावणे, सायकलिंग आणि पोहण्याची तयारी करावी लागते. अनेक दिवसांच्या कठिण परिश्रमानंतर आपल्या शरिरातील बदल आणि स्पर्धेसाठी लागणारे कष्ट यांची सांगड घालून जीम ट्रेनिंग सुध्दा आवश्यक असते. आपल्या जेवणाच्या सवयींवर अंकुश आणून डायटमध्ये शिस्त आणावी लागते. या तीनही स्पर्धकांनी यावेळी अतिशय चांगली तयारी करून फिलिपिन्सच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. डॉ. अमोद कर्पे यांनी 1 तास 2 मिनीटात स्विमींग, 3 तास 1५ मिनीटात सायकलिंग आणि 2 तास 16 मिनीटामध्ये रनिंग पूर्ण केली. वयोगटामध्ये त्यांचा 61 वा नंबर असून पुरूषगटामध्ये 332 वा नंबर आहे. अमर नाईकवाडी यांनी 40 मिनीटांमध्ये स्विमींग, 2 तास 44 मिनीटांमध्ये सायकलिंग आणि 2 तास 12 मिनीटांमध्ये रनिंग पूर्ण केली. वयोगटामध्ये त्यांचा 22 वा नंबर असून पुरूषगटामध्ये त्यांचा 1५2 वा नंबर आहे. करण राजपाल यांनी 4५ मिनीटांमध्ये स्विमींग, 2 तास 37 मिटीटांमध्ये स्विमींग आणि 1 तास ५३ मिनीटांमध्ये रनिंग पूर्ण केली. वयोगटामध्ये त्यांचा १५ वा नंबर असून पुरूषगटामध्ये त्यांचा 86 वा नंबर आहे.
याआधी झालेल्या स्पर्धांमध्ये करण राजपाल, अमर नाईकवाडी, जय मालपाणी यांनी सहभाग नोंदविलेला आहे मात्र डॉ. अमोद कर्पे यांनी प्रथमच आयर्नमॅन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मिळविलेले यश अनेकांना स्फूर्तीदायी आहे. डॉ. संजय विखे हे जखमी असल्या कारणाने यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाही. याआधी झालेल्या गोवा आयर्नमॅन स्पर्धेमध्ये डॉ. संजय विखे, अमर नाईकवाडी, करण राजपाल, कपिल चांडक, प्रतिक सुपेकर, वेणुगोपाल लाहोटी, आदित्य राठी यांनी यश मिळविले आहे.