
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिवसेनेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर निष्ठा जपणार्या शिवसैनिकांचा आणि कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता निष्ठपुर्वक काम करणार्या शिवसैनिकांचा सन्मान होणे कुठेतरी गरजेचे होते. त्यांचा सन्मान होत असल्याने शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील या हेतुने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाचे संस्थापक अमर कतारी यांनी निष्ठा पुरस्काराचे आयोजन केले होते. पुरस्कार सोहळ्याकरीता युवासेना विस्तारक मितेश साटम, अजय व्हनोळे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे उपस्थित होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1980 पासून कोपरगाव शिवसेनेचे काम करणारे, पक्षाची बाजू सोशल मीडियावर भक्कमपणे मांडणारे मराठी चित्रपट लेखक, निर्माते भारत मोरे, अकोले सारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात शिवसेनेचे काम वाढवणारे व स्वखर्चाने प्रत्येक निवडणूक लढवणारे प्रभाकर फापाळे, महिला आघाडीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणार्या शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमुख शितलताई हासे, युवकांचे मोठे संघटन उभारणारे तळेगाव येथील सागर भागवत, स्वतः दिव्यांग असूनही शिवसेनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन शिवसैनिकांना प्रेरणा देणार्या गणेश धात्रक यांचा सन्मान निष्ठा पुरस्कार देऊन करण्यात आला. त्यासोबतच सावरगाव येथील सुनील घुले, मालदाड येथील कैलास नवले, घारगांव येथील रंगनाथ फटांगरे शहरातील आसिफ तांबोळी आणि कांचन गायकवाड यांचा विशेष उल्लेखनीय निष्ठा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अमर कतारी यांच्या सारखे नेतृत्त्व प्रत्येक शहरात शिवसेनेला लाभले तर शिवसेना नक्कीच अधिक बळकट होईल. असे सांगून अजय व्हनोळे यांनी अमर कतारी यांना शुभेच्छा दिल्या. शहरप्रमुख असतांना देखील शेकडो शिवसैनिकांना एकत्र आणत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत येथील शिवसैनिकांचे कौतुक मितेश साटम यांनी केले. सूर्यकांत शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देऊन शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले. पठार भागातील कार्यकर्ते पंकज पडवळ यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. 22 जानेवारी रोजी अयोध्यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा निमित्त स्त्रोत पठण कार्यक्रम घेऊन प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंचावर युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, गोविंद नागरे, वैभव अभंग, अक्षय बिल्हाडे, अमोल डुकरे, अक्षय गाडे, शहर संघटक पप्पू कानकाटे, निवड समितीचे दीपक साळुंके, संभव लोढा, अशोक बढे, भगवान पोपळघट, महिला आघाडीच्या संगीताताई गायकवाड, आशाताई केदारी कोपरगाव शहर संघटिका राखीताई विसपुते, एकनाथ खेमनर, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, अमित फटांगरे, रंगनाथजी फटांगरे, अनिल खेमनर, शरद कवडे, गोपाल लाहोटी, भीमा अनाप, मुकेश काटे, शिव आरोग्य सेनेचे आजीज भाई मोमीन, जयदेव यादव, प्रवीण चव्हाण, आसिफ तांबोळी, लखन घोरपडे, अनुप म्हाळस, प्रशांत खजुरे, ओमकार सस्कर, माधव फुलमाळी, प्रशांत कापुरे, प्रकाश चोथवे, सागर भागवतसह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.