
नऊ वर्षापासून रुग्णसेवेसाठी अविरत कार्यरत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेरच्या रुग्णसेवेसाठी गेली नऊ वर्षापासून अविरत कार्यरत आहे. 1 फेब्रुवारी रोजी धन्वंतरीच्या कृपेने हॉस्पिटल सुरू करून नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे.
डॉक्टर हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने त्यांनी शासकीय विद्यापीठातून एम.बी.बी.एस पूर्ण केले व त्यानंतर के. ई.एम. हॉस्पिटल पुणे येथे एम. एस. पूर्ण केले. वाय.सी.एम. हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे शस्त्रक्रियेचा अनुभव घेऊन एक वर्षात 1 हजार शस्त्रक्रिया केल्या. फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांनी संगमनेर येथे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. आणि संगमनेर शहरात डॉ. प्रवीणकुमार पानसरे यांचे नाव नावारूपाला येत गेले. फेब्रुवारी 2015 मध्ये डॉ. प्रवीणकुमार पानसरे व डॉ. दिपाली प्रवीणकुमार पानसरे यांनी संगमनेरात 100 बेडचे धन्वंतरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केले. 9 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आज धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे एकूण पाच फुल टाइम स्पेशलिटी व 20 वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. जनरल सर्जरी, न्युरो सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, चेस्ट फिजिशियन, स्त्री रोग विभाग असे एकूण पाच स्पेशालिटी पूर्ण वेळ कार्यरत आहे. हॉस्पिटलचे एकूण पंधरा बेडचे सुसज्ज व यंत्रसामग्रीयुक्त आय. सी.यू., स्वतंत्र वातानुकुलीत 4 डीलक्स रूम व स्वतंत्र 7 स्पेशल रूम उपलब्ध आहे.