संगमनेरमधील चुकीच्या स्पीडब्रेकरमुळे नागरिक त्रस्त ; आरोग्यावर गंभीर परिणाम

0
259

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील अनेक रस्त्यांवर बनवण्यात आलेले स्पीडब्रेकर हे भारतीय रस्ते (IRC:99-1988) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसून, स्थानिक पातळीवर मनमानी पद्धतीने बनवले गेले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये मणक्याचे विकार झपाट्याने वाढत आहेत.
काही रस्त्यांवर एकाच ठिकाणी दोन ते तीन फुट उंच आणि टोकदार स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत. रस्ता तयार करताना काही दुकानदार व घरमालक स्वतः रस्त्यावर दगड, गोटे व विटा ठेवून ठेकेदाराकडून त्यावर डांबर टाकून स्पीड ब्रेकर तयार करतात. ही पद्धत शासकीय नियमांच्या सरळ सरळ विरोधात आहे.

शहरातील अनेक रस्त्यांची आधिच दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे कमी की काय म्हणून हे स्पीडब्रेकर माणसांचे मणके ढिले करण्याचे काम करत आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे धुळ, खड्डे, आणि स्पीडब्रेकर हे रस्त्यांचे प्रश्‍न नागरीकांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले स्पीडब्रेकर हे शरीरावर तीव्र झटके निर्माण करतात. विशेषतः दुचाकीस्वारांना हे झटके थेट मणक्यावर बसतात. परिणामी: स्लिप डिस्क (डश्रळि ऊळील), स्पोंडिलायसिस (डिेपवूश्रेीळी), मणक्याची झीज(ऊळील ऊशसशपशीरींळेप), कंबर व मानेत सतत वेदना यासारखे विकार वाढत आहेत.
शहरातील विविध खासगी डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा झटक्यांमुळे मणक्यांतील लवचिकता कमी होते आणि तीव्र वेदना निर्माण होतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व कार्यालयीन काम करणारे तरुण विशेषतः या समस्यांनी ग्रस्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here