कारच्या धडकेत युवक ठार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या कारने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.
अनिल हरिभाऊ खुळे (रा. रायतेवाडी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, अनिल हरिभाऊ खुळे हे रायतेवाडी फाटा येथे असणार्या गतीरोधकातून दुचाकीवरून जात होते परंतू याचवेळी या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने स्वीफ्ट कारने या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने यात अनिल खुळे यांच्या जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीसांनी अपघातास कतारणीभूत ठरलेल्या कारचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे.