लायन्स संगमनेर सॅफ्रॉनकडून 100 झाडांचे वृक्षारोपण
वर्षभरात 1000 वृक्षारोपण करण्याचे नियोजन
संगमनेर (प्रतिनिधी) – लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) यांच्या वतीने कासारवाडी, गंगामाई घाट परिसर आणि मालपाणी क्लब परिसर संगमनेर येथे शुक्रवार दि. १ ऑगष्ट २०२४ रोजी १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनकडून या प्रकल्पाचे आयोजन केले जाते.
प्रवरा नदीलगत जमिनीची धूप रोखणे आणि प्रदूषणाला आळा घालणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रकल्प प्रमुख आणि लायन्स सॅफ्रॉनचे माजी अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले.
अध्यक्ष स्वाती मालपाणी यांनी यावर्षी लायन्स सॅफ्रॉनचे 1000 वृक्षारोपण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, राजेश मालपाणी, सचिव प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा यांसह अनेक सदस्य उपस्थित होते.
मागील वर्षी बिरेवाडी येथे बिरोबा मंदिर परिसरात 300 जंगली झाडांच्या वृक्षारोपणाबरोबर संरक्षक जाळी आणि ठिबकच्या सहाय्याने ती झाडे जतन करण्यात आली.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास भंडारी, महेश डंग, राजेश मालपाणी, धनंजय धुमाळ, सुभाष मणियार, देविदास गोरे, शेखर गाडे, अजित भोत, मोहन मोरे, डॉ अतुल देशमुख, चंद्रशेखर गाडे, डॉ. अमोल वालझाडे, कल्याण कासट, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ, सुजित दिघे, प्रणित मनियार, संदीप गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ, शशांक दर्डा, तुषार डगळे, सार्थक कोठारी, प्रशांत रहाणे, विशाल थोरात, नयन पारख, सचिन गाडे, अविनाश वर्पे यांनी मोलाची मदत केली.